शिवथर येथे वृद्धाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:33 IST2021-05-03T04:33:51+5:302021-05-03T04:33:51+5:30
सातारा : तालुक्यातील शिवथर येथील एका ६४ वर्षीय वृद्धाने पत्र्याच्या शेडमध्ये दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दिलीप खोमणे ...

शिवथर येथे वृद्धाची आत्महत्या
सातारा : तालुक्यातील शिवथर येथील एका ६४ वर्षीय वृद्धाने पत्र्याच्या शेडमध्ये दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दिलीप खोमणे असे आत्महत्या करणाऱ्या वृद्धाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दिलीप बाजीराव खोमणे (वय ६४, रा. शिवथर, ता. सातारा) यांनी दि. ३० रोजी दुपारी १२ वाजेपूर्वी रमेश पुजारी (सध्या रा. वाई) यांच्या घराच्या बाहेर असणाऱ्या उघड्या पत्र्याच्या शेडमधील पत्र्याच्या खाली असलेल्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची खबर शशिकांत तानाजी बंडलकर (वय २६, रा. शिवथर, ता. सातारा) या युवकाने सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली. त्यांच्या आत्महत्येचे कारण पोलिसांना समजू शकले नसून पोलीस त्यांच्या नातेवाइकांकडे चौकशी करत आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव हे करत आहेत.