शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या त्रासाला कंटाळून वृद्धाचा आत्महत्येचा प्रयत्न, सतर्क नागरिकांनी वाचविले प्राण; साताऱ्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 16:01 IST

सातारा : सकाळी साडेदहाची वेळ. फुटक्या तलावात काही मोजकेच युवक आणि काही नागरिक पोहत होते. त्यावेळी अचानक तलावातील मंदिराच्या ...

सातारा : सकाळी साडेदहाची वेळ. फुटक्या तलावात काही मोजकेच युवक आणि काही नागरिक पोहत होते. त्यावेळी अचानक तलावातील मंदिराच्या पाठीमागून एका वृद्धाने तलावात कपड्यासकट उडी मारली. हा प्रकार काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने तलावात उडी मारून वृद्धाचा जीव वाचविला.काही क्षण जरी उशिरा झाला असता तर वृद्धाला जीवाला मुकावे लागले असते. मुलाच्या त्रासाला कंटाळून आपण हे पाऊल उचलले होते, असे त्या वृद्धाने हताश होऊन जीव वाचविणाऱ्या नागरिकांना सांगितले.सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने फुटक्या तलावामध्ये पोहण्यासाठी युवक व नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे. पहाटे सहापासून या तलावात पोहण्यासाठी गर्दी होत असते. मात्र, दहानंतर इथली गर्दी ओसरू लागते. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता काही मोजकेच युवक व नागरिक पोहत होते.त्यावेळी ६३ वर्षीय एक वृद्ध फुटका तलाव गणेश मंदिरात आले. दर्शन घेऊन मंदिराच्या मागील बाजूला गेले. त्यानंतर त्यांनी अचानक कपड्यासकट तलावात उडी मारली. याच तलावाशेजारी अनुजित बोधे यांचे घर आहे. बोधे हे गॅलरीमध्ये उभे असताना त्यांना वृद्धाने तलावात उडी मारल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी तातडीने घरातून बाहेर येऊन पोहत असलेल्यांना आवाज दिला. मात्र, त्यांना एेकायला आले नाही. त्यामुळे ते धावतच तलावाजवळ आले. तेव्हा प्रसाद भोंडे हे पोहत होते. त्यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या वृद्धाला पाण्यातून वर काढले.तुम्ही कशासाठी हा प्रकार केला, असं त्यांना जेव्हा उपस्थित नागरिकांनी विचारलं, तेव्हा त्यांनी मुलाचा आणि पुतण्याचा त्रास सहन होत नाही. मुलगा हात उगारतो. त्यापेक्षा जीवनच नको म्हणून मी आत्महत्या करत होतो, असं त्यांनी सांगितलं.लक्ष असू द्या..फुटका तलाव हा मध्यवस्तीत आहे. त्यामुळे काैटुंबिक कलह झाल्यास अनेकजण या तलावात आत्महत्या करण्यासाठी येतात. यापूर्वीही अनेकांनी या तलावात आत्महत्या केली आहे. असे प्रकार पुन्हा कधीही घडू शकतात. त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. शिवाय इथे दिवसा सुरक्षा रक्षकांची नेमणूक व्हावी, अशीही सातारकरांची मागणी आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdrowningपाण्यात बुडणे