अंगापूर : सातारा तालुक्यातील बोरगाव येथे सर्व्हिस रोडलगत दि. १४ डिसेंबर रोजी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास पुण्याहून बेळगावला वऱ्हाड घेऊन निघालेली ट्रॅव्हल्स पलटी झाली. यामध्ये आठ वऱ्हाडी जखमी झाले. हे सर्वजण पुण्यातील आहेत. जखमींवर साताऱ्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे महामार्गावर सात किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या.याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे येथून बेळगावकडे ट्रॅव्हल्समधून (डीडी ०१ डब्ल्यू ९५९८) लग्नाचं वऱ्हाड निघालं हाेतं. सतीश वसंत सोट (रा. तरडगाव, पो. निंबोडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) हा या ट्रॅव्हल्सचा चालक होता.पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव (ता. सातारा) गावच्या हद्दीत ही ट्रॅव्हल्स आली असता चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. यात ट्रॅव्हल्स पलटी झाली. हा अपघात झाला तेव्हा वऱ्हाडी मंडळींनी आरडाओरड सुरू केली. काही स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन प्रवाशांना बाहेर काढले. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही; परंतु तीन जण गंभीर तर पाच किरकोळ जखमी झाले.या अपघातामुळे वाहतूक मात्र बराचवेळ विस्कळीत झाली. त्यानंतर बोरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू ठेवली. तासाभरात रस्त्यातून ट्रॅव्हल्स बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. याप्रकरणी ट्रॅव्हल्सचालकाविरोधात बोरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, सहायक पोलिस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
जखमी प्रवाशांची नावेया अपघातात ट्रॅव्हल्समधील सुमती शांताराम मोरे, ऋतुजा रवींद्र देसाई व अपेक्षा महेंद्र जाधव या प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या. तर श्रीकांत कृष्णा देसाई, श्वेता श्रीकांत देसाई, हेमंत रामकृष्ण देसाई, मनीष मनोहर देसाई आणि स्वप्नील लक्ष्मीकांत चव्हाण (सर्व रा. पुणे) यांना गंभीर जखमा झाल्या असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात ट्रॅव्हल्सचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Web Summary : A wedding bus overturned near Borgaon, Satara, injuring eight Pune residents. The driver lost control on the Pune-Bangalore highway. Injured individuals are receiving treatment in Satara. Police are investigating.
Web Summary : सतारा के बोरगाँव के पास एक शादी की बस पलटने से पुणे के आठ निवासी घायल हो गए। पुणे-बैंगलोर राजमार्ग पर चालक ने नियंत्रण खो दिया। घायलों का सतारा में इलाज चल रहा है। पुलिस जांच कर रही है।