शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

विषारी अन् घातक धुराची अफवा अन् सातारकरांनी घेतला धसका, तिसऱ्या दिवशीही आग विझविण्याचे प्रयत्न सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 15:57 IST

तिसऱ्या दिवशीही पालिकेचा डेपो धुमसलेलाच 

सातारा : सातारा पालिकेच्या सोनगाव येथील कचरा डेपोत सोमवारी लागलेली आग तिसऱ्या दिवशीही धुमसत होती. ही आग विझविण्यासाठी पालिका प्रशासनाकडून वाई, कराड, रहिमतपूर व महाबळेश्वर या पालिकांचीही मदत घ्यावी लागली; परंतु आग आटोक्यात आली नाही.दरम्यान, धुरामुळे गंभीर स्वरूपाचे आजार होत असल्याची अफवा पसरल्याने कचरा डेपो व अजिंक्यतारा परिसरातील नागरिकांनी भलतीच धास्ती घेतली. काही नागरिकांनी तर खबरदारीचा उपाय म्हणून गावी जाण्याचे नियोजनही केले.सोनगाव येथील कचरा डेपोत सोमवारी (दि. ९) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग वणव्यामुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाच आहे. या आगीमुळे कचऱ्याने पेट घेतल्याने डेपोत गेल्या तीन दिवसांपासून अक्षरश: आगडोंब उसळला आहे. सातारा पालिकेच्या अग्निशमन व आराेग्य विभागाची यंत्रणा ही आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याचे ती विझविण्याचे नाव घेईना. बुधवारी (दि. ११) रात्री आठ वाजेपर्यंत केवळ ३० ते ३५ टक्के आग आटोक्यात आली होती. यासाठी पालिका प्रशासनाला अन्य पालिकांची मदतही घ्यावी लागली. दरम्यान, कचरा डेपोतून निघणारा धूर हा अत्यंत विषारी अन् घातक असल्याची अफवा अज्ञातांकडून पसरविण्यात आली आहे. त्यामुळे डेपो परिसरातील वाड्या-वस्त्या तसेच अजिंक्यतारा पायथा परिसरातील नागरिकांनी या अफवेचा एकच धसका घेतला आहे.टँकरच्या १०० हून अधिक फेऱ्या...५० तासांहून अधिक काळ धुमसत असलेली ही आग विझविण्यासाठी एकूण १४ वाहनांच्या तीन दिवसांत १०० हून अधिक फेऱ्या झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. आग नियंत्रणात आणण्यासाठी जलदगतीने पाणी मिळाले, या कामात खंड पडू नये यासाठी पालिकेकडून डेपोजवळ नवीन लाईन टाकण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Garbage Depot Fire: Smoke Rumors Cause Panic, Efforts Continue

Web Summary : A fire at Satara's Songaon garbage depot, burning for three days, sparked panic due to rumors of toxic smoke. Firefighters from multiple municipalities are working to extinguish the blaze, which is only partially contained. Over 100 tanker trips have been made to combat the fire.