विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:13 IST2021-02-18T05:13:22+5:302021-02-18T05:13:22+5:30

मायणी : येथील मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या भारतमाता विद्यालयातील १९९२-९३ या दहावीच्या शैक्षणिक वर्षात माजी विद्यार्थ्यांकडून भारतमाता विद्यालयातील ...

Educational materials for students | विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

मायणी : येथील मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या भारतमाता विद्यालयातील १९९२-९३ या दहावीच्या शैक्षणिक वर्षात माजी विद्यार्थ्यांकडून भारतमाता विद्यालयातील मुले व वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशालेतील मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप केले.

कौटुंबिक परिस्थितीमुळे अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसे शैक्षणिक साहित्य मिळत नाहीत. शिवाय दुष्काळ व कोरोना परिस्थितीने गोरगरिबांचे कंबरडे मोडले आहे. या कुटुंबातील मुला-मुलींना पाठ्यपुस्तकाबरोबर इतर शैक्षणिक साहित्य मिळावे आणि त्यांचे शिक्षण सुलभ व्हावे. या हेतूने भारतमाता विद्यालयात सन १९९२-९३ मध्ये इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांपैकी कैलास जाधव, अनिल माने, संजय लुकडे, दीपककुमार देशमुख यांनी पुढाकार घेऊन व सद्या नोकरी व व्यवसाय करणारे सर्व वर्गमित्रांनी भारतमाता विद्यालय व वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशालेतील मुला-मुलींना शालेय साहित्याबरोबरच कोरोनाशी दोन हात करण्यास उपयुक्त असलेले मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले.

यावेळी मुख्याध्यापक बाळकृष्ण इनामदार, मुख्याध्यापिका वर्षा येवले, महावीर कुदळे, प्रकाश शिंदे, पी. के. जगताप, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. दादासाहेब कचरे यांनी प्रास्तविक केले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. महेश जाधव यांनी आभार मानले.

Web Title: Educational materials for students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.