मुलींना शिक्षण मिळावे म्हणून चंद्रहार पाटील यांच्याकडून शिक्षणसंस्था : पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:43 IST2021-08-28T04:43:53+5:302021-08-28T04:43:53+5:30
खटाव : ‘ग्रामीण भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये, तसेच मुलींनी शिक्षण घ्यावे, या उदात्त हेतूने खटावमध्ये चंद्रहार ...

मुलींना शिक्षण मिळावे म्हणून चंद्रहार पाटील यांच्याकडून शिक्षणसंस्था : पाटील
खटाव : ‘ग्रामीण भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये, तसेच मुलींनी शिक्षण घ्यावे, या उदात्त हेतूने खटावमध्ये चंद्रहार पाटील यांनी शिक्षण संस्था काढून मुलींसाठी शिक्षणाची द्वार खुले केले. दादांचे शिक्षण क्षेत्रातील काम अविस्मरणीय आहे,’ असे प्रतिपादन शहाजीराजे महाविद्यालयाचे प्राचार्य संजय पाटील यांनी केले.
चंद्रहार पाटील शिक्षण संस्थेचे संस्थापक चंद्रहार पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त शहाजीराजे महाविद्यालय, खटाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी राजेंद्र भोसले, सेवानिवृत्त प्रा. बंडा गोडसे, एस. वाय. फडतरे, पर्यवेक्षक डॉ. पी. डी. कुलकर्णी, डॉ. प्रिया शिंदे, युवा नेते राहुल पाटील, सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, ग्रामपंचायत सदस्य दीपक घाडगे, माधुरी सकटे, राहुल जमदाडे, रमेश शिंदे, मुसा काजी उपस्थित होते.
कॅप्शन
२७खटाव
खटाव येथील शहाजीराजे महाविद्यालयात चंद्रहार पाटील यांच्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात प्राचार्य संजय पाटील यांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी राजेंद्र भोसले, निवृत्त प्रा. बंडा गोडसे, एस. वाय. फडतरे उपस्थित होते. (छाया : नम्रता भोसले)