बहिणीच्या आठवणीसाठी शैक्षणिक उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2016 01:42 IST2016-06-22T23:41:11+5:302016-06-23T01:42:02+5:30

निवृत्त अभियंत्यांची आस्था : १५० खेड्यांत शैक्षणिक अंकाचे मोफत वितरण == गुड न्यूज

Educational activities for the sister's memories | बहिणीच्या आठवणीसाठी शैक्षणिक उपक्रम

बहिणीच्या आठवणीसाठी शैक्षणिक उपक्रम

शिरवळ : स्पर्धेच्या युगात एकमेकांच्या सुख-दु:खात मिसळण्यासाठीही कोणा व्यक्तीकडे वेळ नसल्याचे चित्र आहे. मात्र, असे काही व्यक्ती असतात की ज्यांना समाजाप्रती असणारी आस्था निवृत्ती नंतरही स्वस्थ बसू देत नाही. त्यापैकीच पाटबंधारे विभागामधील निवृत्त शाखा अभियंता (सिव्हील) चतुर्भुज रामभाऊ खोपडे हे अवलिया. आपली दिवंगत थोरली बहीण मुक्ताबाई सर्जेराव बांदल यांचे नाव समाजामध्ये आठवण म्हणून सतत तेवत राहण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत.खोपडे यांनी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी स्वखर्चातून व आपले नातेवाईक हणुमंत शंकरराव खोपडे यांच्या सहकार्यातून आपली दिवंगत थोरली बहीण मुक्ताबाई सर्जेराव बांदल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना विनामूल्य शैक्षणिक सर्वसाधारण माहितीच्या अंकाचे वितरण केवळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक जगाची ओळख होऊन करिअर घडविण्यासाठी मदत व्हावी. या उद्देशाने गेल्या दोन वर्षांपासून म्हणजे १६ मे २०१५ पासून कार्यरत आहेत.आजपर्यंत चतुर्भुज खोपडे यांनी सातारा, पुणे, रायगड जिल्ह्यांमधील ११ तालुक्यांमधील सुमारे १५० खेडेगावांत जाऊन पालकांची व शिक्षकांची भेट घेत सुमारे ३९०० विद्यार्थी-विद्यार्थिनींना या शैक्षणिक अंकाचे वितरण केले असून, यासाठी त्यांना स्वत:च्या वाहनातून तब्बल ४५०० च्यावर किलोमीटरचा प्रवास स्वखर्चातून करावा लागला आहे. सातारा जिल्ह्यातील दहिवडी तालुका ४ गावे, खंडाळा तालुक्यताील १८ गावे, फलटण तालुक्यातील ५ गावे, पुणे जिल्ह्यातील भोर तालुका ५६ गावे, पुरंदर तालुका २० गावे, बारामती तालुका ७ गावे, हवेली तालुका १५ गावे, मावळ तालुका ६ गावे, मुळशी तालुका ८ गावे, वेल्हा तालुका ५ गावे, तर रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील सहा गावांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

लेक टॅपिंग लेक्चर
विशेष म्हणजे चतुर्भुज खोपडे यांनी विविध जिल्ह्यांमध्ये कोयना धरणातील लेक टॅपिंगबाबत विविध विद्यालयांमध्ये ५८ लेक्चर दिली आहेत. अशा या अवलिया असणाऱ्या चतुर्भुज खोपडे यांच्या चेहऱ्यावर समाजासाठी आपण काहीतरी करू शकलो याचे समाधान मोठ्या प्रमाणात दरवळत आहे.

थोरली बहीण मुक्ताबाई बांदल यांनी दिलेली शिकवण व त्यांची आठवण समाजामध्ये तेवत राहून ग्रामीण भागातील विद्यार्थी हा
घडला पाहिजे या उद्देशाने शैक्षणिक अंकाचे स्वखर्चातून विनामूल्य वितरण करीत आहेत.
-चतुर्भुज खोपडे, निवृत्त शाखा अभियंता, सातारा

Web Title: Educational activities for the sister's memories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.