शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात पोवई नाक्यावरील किसन वीरांच्या पुतळ्याला फलकाचे ग्रहण, यंत्रणेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 17:53 IST

थोर स्वातंत्र्यसेनानी किसन वीर यांचे नाव घेतल्याशिवाय जिल्ह्यातल्या राजकारण्यांच्या सभा पूर्ण होत नाहीत. मात्र, पोवई नाक्यावरील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आवारात असलेला वीरांचा पुतळा फलकांच्या ग्रहणात अडकलेला या मंडळींना दिसत कसा नाही?, असा सवाल देशप्रेमी नागरिक विचारताना दिसत आहेत.

ठळक मुद्दे स्वातंत्र्यसैनिकांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांनाही विसरजिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आवारात असलेला वीरांचा पुतळा फलकांच्या ग्रहणात

सातारा : थोर स्वातंत्र्यसेनानी किसन वीर यांचे नाव घेतल्याशिवाय जिल्ह्यातल्या राजकारण्यांच्या सभा पूर्ण होत नाहीत. मात्र, पोवई नाक्यावरील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आवारात असलेला वीरांचा पुतळा फलकांच्या ग्रहणात अडकलेला या मंडळींना दिसत कसा नाही?, असा सवाल देशप्रेमी नागरिक विचारताना दिसत आहेत.पोवई नाक्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेची प्रशासकीय इमारत व शाखा कार्यरत होती. तेव्हा या पुतळ्याकडे विशेष लक्ष दिले जात होते. काही वर्षांपूर्वी प्रशासकीय इमारत जिल्हा परिषदेच्या समोर बांधण्यात आली. हे कार्यालय नवीन इमारतीत गेले. सध्याच्या घडीला जुन्या इमारतीत प्रशिक्षणाचे काम चालते.

इमारतीची भव्यता अजूनही टिकून आहे. पोवई नाक्यावर पूर्वी एवढी मोठी भव्य इमारत अभावानेच होती, त्यामुळे बँकेकडे लगेच लक्ष जात होते. स्वातंत्र्यसेनानी किसन वीर यांच्या पुतळ्याला अभिवादन करूनच बँकेत येणारा प्रत्येक जण प्रवेश करत होता.

आता मात्र परिस्थिती बदलेली पाहायला मिळते. या इमारतीकडे जसे दुर्लक्ष झाले तसे इमारतीभोवती टपऱ्या वाढल्या आणि जाहिरातीचे फलकही! जाहिरात करणाऱ्यांना बहुधा किसन वीरांच्या कर्तृत्वाची उंची माहित नसावी. पोवई नाक्याकडून बसस्थानकाकडे वळताना वीरांचा पुतळा नजरेस पडायचा. आता मात्र या पुतळ्यासमोर जाहिरात फलक उभे राहू लागल्याने वीरांचा पुतळा झाकोळला आहे.

देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात आणि जिल्ह्याच्या राजकारणात किसन वीर आबांचे अमूल्य असे योगदान आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून आबांनी त्यांना मोलाची साथ दिली. माजी खासदार लक्ष्मणराव पाटील वीरांचे शिष्य आहेत. त्यांनी कायमच आबांच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न केला.

सध्या मात्र वयोमानामुळे लक्ष्मणराव पाटील सक्रिय राजकारणापासून दूर गेले आहेत. त्यातच जिल्हा बँकेच्या राजकारणात नेहमी सहभाग असणाऱ्या किसन वीरांची पुढची पीढीही आता बँकेतून पायउतार झालेली आहे. या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून आबांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष केले जातेय का?, अशी खंत लोक व्यक्त करताना दिसतात.बांधकाम विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या रस्त्यावर असे फलक उभे राहतात. ते उभे करणाऱ्यांना वेसण घालण्याचे काम यंत्रणा करत नाही, पालिका फलकांना परवानगी देते, ज्या फलकांना परवानगी दिली नाही, ते पालिकाच काढते.

परवानगी दिल्यानंतर संबंधित फलक कुठे लावला आहे? याची खातरजमा पालिका करत नाही, असे स्पष्टपणे दिसते. आबांच्या योगदानाचे गोडवे गाऊन सभा गाजविणाºया त्यांच्या स्वघोषित अनुयायांनाही त्याचे काही पडले नाही, असेच स्पष्टपणे पुढे येते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरbankबँक