शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कातरखटाव पुलाच्या कामाच्या ठिकाणी सुरूंग स्फोटामुळे भूकंपासारखा आवाज, लहानमोठे दगड बाजारपेठेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 17:10 IST

व्यापारी, ग्रामस्थ भयभीत होऊन सैरावैरा

कातरखटाव : दहिवडी-विटा मार्गावर गेल्या सहा महिन्यांपासून महामार्गाचे काम जोमात सुरू आहे. कातरखटाव येथील नवीन पुलाची उभारणी करण्यासाठी रात्रंदिवस पायाभरणी तर कुठे पाया खोदण्याचे काम सुरू आहे. अशातच सुन्न असणाऱ्या व्यापारी, बाजारपेठेच्या शेजारील पुलाजवळ दुपारी ४ वाजता ब्लास्टिंगचा मोठा आवाज झाला. यावेळी लहान- मोठे दगड दुकानावर, घरावर, रस्त्यावर पडल्याने एकच गोंधळ उडाला. लोकं, ग्रामस्थ सुरक्षित ठिकाणी पळू लागले. नशीब बलवत्तर असल्याने या घटनेत जीवितहानी झाली नाही.सविस्तर माहिती अशी की, परिसरात रविवारी आठवडी बाजार असल्याने या भागातील व्यापारी, ग्रामस्थांची गर्दी होती. दुपारी ४ वाजता काम चाललेल्या ठिकाणी अचानक ब्लास्टिंगचा मोठा आवाज झाला आणि एकच गोंधळ उडाला. एक मिनिटाच्या आत लोकांनी, व्यापाऱ्यांनी, कामाच्या ठिकाणी धाव घेतली. ग्रामस्थांचा उद्रेक पाहता काही कर्मचाऱ्यांनी भीतीपोटी या ठिकाणाहून पळ काढल्याचे दिसून आले.पुलाच्या मध्यभागी पाया खोदण्यासाठी सुरूंग उडवण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पक्ष्यांच्या थव्याप्रमाणे दगडांचा मारा सगळीकडे झाला होता, अशी माहिती भयभीत झालेले व्यापारी, ग्रामस्थ सांगत होते व तसे दिसतही होते.बाजाराचा दिवस आणि गर्दीच्या ठिकाणी आजूबाजूला लहान-मोठे दगड सुरूंग उडवलेल्या ठिकाणाहून सगळीकडे पसरले होते. यामध्ये नशीब बलवत्तर असल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही; अशी सगळीकडे भयभीत झालेल्या महिला, पुरुषांचा एकच चर्चेचा सूर दिसून येत होता.एकच चर्चा गणित चुकले...याठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सुरुंग उडवण्याच्या अगोदर आजूबाजूच्या काही व्यापाऱ्यांना सूचना केल्या होत्या की काही काळ दुकानातून बाहेर येऊ नका, दुकाने बंद ठेवा. परंतु, सुरुंग उडवण्याचे गणित चुकल्यामुळे सुरुंगाचा स्फोट झाला, अशी चर्चा सुरू आहे.

आमच्या दुकानासमोर दीड ते दोन किलोचा मोठा दगड पडला आहे. एका ग्राहकाला थोडं खरचटलं आहे. नशीब चांगले म्हणून तो बिचारा वाचला आहे. पुलाच्या कामासाठी पाया खोदण्याकरिता सुरूंग उडवण्याचे संबंधित कंपनीचे गणित चुकत आहे. गावाच्या शेजारी एवढा मोठा सुरुंग स्फोट होणे, फार गंभीर बाब आहे. - विनायक सिंहासने, व्यापारी, कातरखटाव

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Blasting at bridge site causes earthquake-like sound, rockfall.

Web Summary : Blasting at a Katarkhatav bridge construction site caused panic as rocks fell on shops and roads. While some merchants were warned, the miscalculated blast resulted in property damage; fortunately, no one was killed or critically injured.