स्वातंत्र्य दिनापासून ई-पीक पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:39 IST2021-08-15T04:39:39+5:302021-08-15T04:39:39+5:30
पिंपोडे बुद्रुक : खरीप हंगामात स्वतंत्र दिनापासून ई-पीक पाहणी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत सातबारा उताऱ्यावर पिकांच्या नोंदी ...

स्वातंत्र्य दिनापासून ई-पीक पाहणी
पिंपोडे बुद्रुक : खरीप हंगामात स्वतंत्र दिनापासून ई-पीक पाहणी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत सातबारा उताऱ्यावर पिकांच्या नोंदी करण्याची संधी एका ॲपद्वारे शेतकऱ्यांना मिळणार आहे.
सध्या सातबारा उताऱ्यावरील नोंदी करण्याचे अधिकार तलाठ्यांना आहेत. यात दुरुस्ती करायची झाल्यास अधिकार मंडळ अधिकाऱ्यांना होते. यामध्ये पीक पेरणी अहवालाच्या नोंदी घेताना शेतकऱ्यांचा सहभाग घेतला जात नव्हता. या प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्याबरोबरच कृषी पुरवठा सुलभ व्हावा, पीकविमा, पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई मिळावी, या उद्देशाने हे ॲप विकसित केले आहेत.
शेतकऱ्यांच्या मोबाइलमध्ये हे ॲप दिले जाईल. त्यावरून शेतकऱ्यांनी स्वतःच्या पीक पेरणीची माहिती भरायची आहे. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागीय स्तर जिल्हा तालुका पातळीवर सनियंत्रण समितीही स्थापन करण्यात आली आहे. विभागीय समितीच्या अध्यक्षपदी विभागीय आयुक्त जिल्हास्तरीय समितीचे जिल्हाधिकारी तर तालुका स्तरीय समितीचे प्रांताधिकारी अध्यक्ष असतील. अन्य सदस्य कृषी माहिती तंत्रज्ञान विभागासह अग्रणी बँकेचे प्रतिनिधी आदींना सामाविष्ट करण्यात आले आहे.