चिंचणीत पिकाची ई-पीक नोंदणी प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:46 IST2021-09-04T04:46:11+5:302021-09-04T04:46:11+5:30
कुडाळ : नांदगणे ते पुनवडीदरम्यानचा पूल वाहून गेल्याने सात ते आठ गावांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामस्थांना आंबेघरमार्गे ...

चिंचणीत पिकाची ई-पीक नोंदणी प्रक्रिया
कुडाळ : नांदगणे ते पुनवडीदरम्यानचा पूल वाहून गेल्याने सात ते आठ गावांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामस्थांना आंबेघरमार्गे वळसा मारून यावे लागत आहे. महिना होऊनही या पुलाचे काम सुरू झाले नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. अतिवृष्टीने नांदगणे-पुनवडीदरम्यानचा पूल वाहून गेला होता. त्या घटनेला आता महिना उलटून गेला तरी अजूनही काम सुरू झाले नाही. पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आदींनी भेट देऊन पाहणी केली होती. हा पूल वाहतुकीस बंद असल्याने केडंबे, तळोशी, वाळंजवाडी, बाहुले, भुतेकर, बोंडारवाडी येथील ग्रामस्थांना डांगरेघर-आंबेघरमार्गे यावे लागत आहे.
बंदोबस्ताची मागणी
0000000
भटक्या कुत्र्यांमुळे उपद्रव
खटाव : खटावसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उपद्रव घातला असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही कुत्री ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांच्या तसेच वाहनधारकांच्या अंगावर धावून जात आहेत. ग्रामपंचायतीने भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
०००००००
प्लास्टिक पिशव्यांच्या वापरात वाढ
सातारा : सातारा पालिकेने कारवाई करूनही शहरातील हातगाडीधारकांकडून प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर केला जात आहे. शहरातील राजवाडा, खणआळी, मोती चौक, देवी चौक, पाचशे एक पाटी, जुना मोटर स्टॅंड परिसरातील अनेक हातगाडीधारक प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू लागले आहेत. पालिकेची दंडात्मक मोहीम थंडावल्याने परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे.
००००००
सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने प्रश्न
सातारा : गरिबांचा आधारवड असलेल्या जिल्हा रुग्णालयाचे सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित विभागास याबाबत पत्रव्यवहार करूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
------
पोलिसांनी गस्त वाढविण्याची गरज
सातारा : शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेता, होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक ठिकाणी वाहतूक शाखेच्या पोलिसांची आवश्यकता आहे. नागरिकांतून वारंवार याबाबत मागणी होत आहे. मात्र वाहतूक शाखेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.