शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Satara ZP: भाजपनं बोलून नाही; करून दाखवलं!, अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीमागे काय राजकारण घडलं..वाचा सविस्तर

By नितीन काळेल | Updated: March 21, 2026 17:51 IST

रात्रीत प्लॅन ठरला : राष्ट्रवादी तीन, तर शिंदेसेनेचे दोन सदस्य फोडले

नितीन काळेलसातारा : सातारा जिल्हा परिषदेची सत्ता हातात घेण्यासाठी भाजपने पहिल्यापासून पावले उचलली होती. त्यामुळे बहुमत नसतानाही आमचाच अध्यक्ष होणार असे नेते सांगत होते. त्यादृष्टीने ‘ऑपरेशन लोटस’चीही तयारी सुरू होती. यामध्ये गुरुवारपर्यंत अध्यक्षांचे नाव निश्चित नव्हते; पण रात्री उशिरापर्यंत नेत्यांची बैठक होऊन प्लॅन आखला आणि सर्व पर्यायही वापरले. यातून राष्ट्रवादीचे तीन आणि शिंदेसेनेचे दोन सदस्यही फोडले. त्यामुळे भाजपने बोलून दाखविले नाही तर करूनही दाखविल्याचे दिसून आले.भाजपने जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक जागा लढविल्या होत्या. तरीही फलटण तालुक्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) आणि कोरेगाव तालुक्यात शिंदेसेनेला काही जागा सोडल्या. निवडणुकीत भाजपने सर्वाधिक २७ जागा जिंकल्या होत्या. पण, बहुमतासाठी सहा सदस्यांचे बळ हवे होते. तरीही भाजप जिल्हा परिषदेवर झेंडा फडकविण्यासाठी ठाम होता. यासाठी सर्व पर्यायांचा वापर करण्यात आला. तरीही भाजप अंतर्गत गुरुवारपर्यंत अध्यक्षपदाची संधी कोणाला द्यायची हे नाव निश्चित नव्हते; पण उपाध्यक्षपदासाठी राजू भोसले यांचे नाव चर्चेत होते. 

वाचा: ‘यशवंतनीती’च्या साताऱ्यात ‘चाणक्यनीती’ विजयी !; जयकुमार, शिवेंद्रसिंहराजे ठरले ‘धुरंधर’भाजप म्हणून सत्ता हस्तगत करणे शक्य नव्हते. यासाठी ‘ऑपरेशन लोटस’ सुरू केले. यासाठी गुरुवारी रात्री उशिरा साताऱ्यातील एका हाॅटेलात बैठक झाली. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष व आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे उपस्थित होते. तसेच भाजपचे २७ आणि अपक्ष एक असे २८ सदस्य होते. त्यावेळी सत्ता स्थापनेवर विस्तृत चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर सकाळच्या सुमारास डाॅ. प्रिया शिंदे यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आले.

हे सदस्य भाजपच्या बाजूला गेले...शिंदेसेनेचे दोन सदस्य भाजपच्या हाताला लागले. कोरेगाव तालुक्यातील हणमंत जगदाळे आणि सारिका फाळके हे इतर सदस्यांबरोबर टूरवर होते. तरीही त्यांनी भूमिका बदलली. तसेच फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सदस्या ऋतुजा जगताप, खटाव तालुक्यातील लता कर्णे आणि सातारा तालुक्यातील सदस्य कामेश कांबळे या राष्ट्रवादीच्या सदस्यांनीही भाजपच्या बाजूने मतदान केले.दुपारी साडेतीनला पदभार स्वीकारला...प्रिया शिंदे यांनी शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह भाजपचे आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, भाजपचे नेते आणि सर्व सदस्य आणि जनतेचे आभार मानतेे. त्यांच्यामुळे मला अध्यक्षपदाची संधी मिळाली. सर्व जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी आणि सदस्यांना बरोबर घेऊन सातारा जिल्हा परिषदेचा कारभार अत्यंत चांगला करून दाखविणार आहे. - डाॅ. प्रिया शिंदे, नूतन अध्यक्षा, जिल्हा परिषद

सातारा जिल्हा उपाध्यक्षपदाचा पदभार घेतला आहे. मी चांगले कामकाज करेन, अशी खात्री देतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले आहे. त्यामुळे बुके, शाल, हारतुरे स्वीकारणार नाही. भेटीसाठी येताना शालेय साहित्य आणावे, तसेच जिल्हा परिषदेचे कामकाज करताना सर्वांचे सहकार्य लाभेल, असा विश्वास आहे. - राजू भोसले, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद

 

पसरणीचे जिल्हा परिषद सदस्य बापू शिंदे यांचे अपहरण झाले नसतानाही पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला. बापू शिंदे स्वत: हजर होऊनही पोलिसांनी जबाब घेतला नाही. उलट अध्यक्ष निवडीवेळी मी आणि संदीप मांडवे जिल्हा परिषदेत आलाे, त्यावेळी आम्हाला ताब्यात घेतले व अध्यक्ष निवडीच्या मतदानापासून रोखले. याप्रसंगी पालकमंत्री देसाई यांच्यासह मकरंद पाटील व नितीन पाटील यांनाही पोलिसांनी धक्काबुक्की केली. पालकमंत्र्यांना इजा झाली. - अनिल देसाई, जिल्हा परिषद सदस्य

भाजपकडे पहिल्यापासून संख्याबळ होतं. अध्यक्षांची निवड असताना झेडपीत त्यांचं काय काम होतं. त्यांनी झालेला पराभव स्वीकारावा. अधिकाऱ्यांना कोणी शिवीगाळ केली, धमकी दिली ते तपासावे. प्रशासनाचा वापर कायदेशीर, बेकायदेशीर काेण करते, हे सांगण्याची गरज नाही. - जयकुमार गोरे, ग्रामविकास मंत्री

English
हिंदी सारांश
Web Title : Satara ZP: BJP Achieves Power Through Strategy, Not Just Talk

Web Summary : BJP secured Satara Zilla Parishad leadership by strategically gaining support from other parties. Despite lacking a majority, BJP successfully elected its candidate as president, showcasing effective political maneuvering and alliance-building.