दिवशी घाटातून प्रवास बनला धोक्याचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:42 IST2021-02-09T04:42:01+5:302021-02-09T04:42:01+5:30
ढेबेवाडीहून पाटणला ये-जा करण्यासाठी दिवशी घाटातून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. या घाटामधील काही ठिकाणच्या दरडी कोणत्याही क्षणी कोसळतील ...

दिवशी घाटातून प्रवास बनला धोक्याचा
ढेबेवाडीहून पाटणला ये-जा करण्यासाठी दिवशी घाटातून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. या घाटामधील काही ठिकाणच्या दरडी कोणत्याही क्षणी कोसळतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरड कोसळून एखादी दुर्घटना झाल्यास संबंधित विभागाला जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांतून केली जात आहे. या घाटातून दररोज विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, परिसरातील ग्रामस्थ पाटणला कामासाठी ये-जा करीत असतात, तर बाजारादिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या नागरिकांना आपला जीव मुठीत धरून घाटातून प्रवास करावा लागतो. घाटात असलेल्या धोकादायक वळणांमध्ये वाहने चालविताना अनेकवेळा किरकोळ, तसेच गंभीर अपघात झाल्याचे प्रकार या ठिकाणी घडलेले आहेत. परिणामी घाटातील रस्त्याचे रुंदीकरण करून वाहतुकीच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.
दिवशी घाटातून पाटणला जाणारे लोक, तसेच डोंगरमाथ्यावर राहत असलेले जुळेवाडी, शिदु्रकवाडी येथील ग्रामस्थांना साहित्याच्या खरेदीसाठी ढेबेवाडी या ठिकाणी ये-जा करावे लागते. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिवशी घाटाची पाहणी करून योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रवासी व वाहनचालकांतून केली जात आहे.