गावच्या एकीमुळे लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांचा एकमेकांवर हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:41 IST2021-09-03T04:41:25+5:302021-09-03T04:41:25+5:30
वाई : ‘चांदक गावकऱ्यांची एकी व लोकसहभागातून कमी खर्चात उत्तम व दर्जेदार मंदिराची निर्मिती झाली. ऐक्य भावनेने लोकप्रतिनिधी व ...

गावच्या एकीमुळे लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांचा एकमेकांवर हक्क
वाई : ‘चांदक गावकऱ्यांची एकी व लोकसहभागातून कमी खर्चात उत्तम व दर्जेदार मंदिराची निर्मिती झाली. ऐक्य भावनेने लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांचा एकमेकांवर हक्क निर्माण होतो,’ असे प्रतिपादन आमदार मकरंद पाटील यांनी केले.
चांदक (ता. वाई) येथे आमदारांचा स्थानिक विकास निधी व लोकसहभागातून ३७ लाख रुपये खर्चाच्या भैरवनाथ मंदिराचे लोकार्पण आमदार पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे, उपसभापती विक्रांत डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य संगीता मस्कर, अनिल जगताप, दिलीप बाबर, शशिकांत पवार, कांतिलाल पवार, ॲड. उदयसिंह पिसाळ, सत्यजित वीर, रमेश गायकवाड, ॲड. नीलेश डेरे उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘पावसाच्या अवकृपेमुळे शेती विकासाला मर्यादा आहेत. मात्र ग्रामस्थांनी जमीन उपलब्ध करून दिल्यास लघुपाटबंधारे तलावाच्या उभारणीसाठी मी कटिबद्ध राहीन. दरेकर वस्ती रस्ती, व्यासपीठ व चावडी इमारतीच्या विकासासाठी निधी द्यावा.’
महादेव मसकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
सरपंच सोनाली संकपाळ, उपसरपंच मोहन मोरे, दत्तात्रय भिलारे, तानाजी संकपाळ, विठ्ठल भिलारे, सुनील दरेकर, विश्वास भिलारे, तानाजी संकपाळ, उत्तम खामकर, शंकर भिलारे, नितीन रोमन, अनिल दरेकर, शुभम सावंत, कुमार जगताप, राजेंद्र सोनावणे, अमोल कदम, विलास जगताप, सुधीर यादव, अनिकेत जाधव, नाना चिकणे, भरत देवराशे, नाना चव्हाण, रमेश बुलंगे उपस्थित होते. ठेकेदार रवींद्र मांढरे यांचा सत्कार करण्यात आला. सुनील संकपाळ यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले. आशिष संकपाळ यांनी आभार मानले.