शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

दिलासा! पावसाच्या हजेरीमुळे सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई थोडी कमी

By नितीन काळेल | Updated: October 3, 2023 19:16 IST

तरीही ९६ टॅंकर सुरू, माणमध्ये टॅंकर कमी

सातारा : जिल्ह्यात परतीचा पाऊस काही भागात चांगला झाल्याने टंचाईची स्थिती कमी होत आहे. त्यामुळे टॅंकरची संख्या १०२ वरुन आता ९६ पर्यंत कमी झाली आहे. तरीही सध्या ८६ गावे आणि ४०४ वाड्यांसाठी टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. उन्हाळ्यातही वळीव बरसला नाही. त्यानंतर मान्सूनचा पाऊसही चांगला झाला नाही. त्यामुळे पावसाची ३५ टक्के तूट आहे. ही तूट दुष्काळी तालुक्यात अधिक आहे. परिणामी आजही अनेक भागात पाऊस पडत असताना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तरीही मागील १५ दिवसांत जिल्ह्याच्या पूर्व भागात अनेक ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस पडला. त्यामुळे काही गावांचे आणि अनेक वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा करणारे टॅंकर बंद झाले आहेत.जिल्ह्यात सध्यस्थितीत माण तालुक्यात टंचाईची स्थिती अधिक आहे. ४७ गावे आणि ३४४ वाड्यांतील ७३ हजार नागरिक आणि ५७ हजार पशुधनाला टॅंकरच्या पाण्याचा आधार आहे. यासाठी ६१ टॅंकर सुरू आहेत. तर तालुक्यातील पांगरी, वडगाव, मोगराळे, पाचवड, बिजवडी, अनभुलेवाडी, राजवडी, मोही, मार्डी, थदाळे, डंगिरेवाडी, वावरहिरे, हस्तनपूर, भाटकी, खडकी, धुळदेव, ढाकणी, वरकुटे म्हसवड, कारखेल, संभूखेड, वाकी, रांजणी, हवालदारवाडी, पळशी, पिंपरी, भालवडी, खुटबाव, इंजबाव, वारुगड, परकंदी, पांढरवाडी, उकिर्डे, विरळी, कुरणेवाडी आदी गावांना आणि त्या अंतर्गत वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. खटाव तालुक्यातील २१ गावे आणि २४ वाड्यांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. या टॅंकरवर २९ हजार नागरिक आणि ८ हजार २४९ जनावरांची तहान अवलंबून आहे. यासाठी १४ टॅंकर सुरू आहेत. मांजरवाडी, मोळ, गारवडी, नवलेवाडी, मांडवे, गोसाव्याचीवाडी, कणसेवाडी, खातवळ, येलमरवाडी, धोंडेवाडी, दातेवाडी येथे टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. फलटण तालुक्यातही १० गावे आणि ३६ वाड्यांसाठी १२ टॅंकर सुरू आहे. यावर प्रत्येकी १५ हजार नागरिक आणि पशुधनाची तहान अवलंबून आहे. तालुक्यातील सासवड, दुधेबावी, वडले, मिरगाव, आरडगाव, आंदरुड, घाडगेमळा येथे टॅंकर सुरू आहेत. कोरेगाव तालुक्यातीलही चवणेश्वर, होलेवाडी, विखळे, फडतरवाडी आदी सहा गावांत टॅंकरने पाणीपुरवठा केला जातोय. वाई तालुक्यात चांगला पाऊस होतो. पण, सध्या तालुक्यातील चांदक आणि आनंदपूर गावासाठी टॅंकर सुरू आहेत.माणमध्ये टॅंकर कमी..माण तालुक्यात मागील काही दिवसांत चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे टंचाईची स्थिती काही प्रमाणात कमी झालेली आहे. आठवड्यात टॅंकरची संख्या सहाने कमी झाली आहे. सध्या ६१ टॅंकरने नागरिकांना तसेच पशुधनाला पाणीपुरवठा केला जातोय. तर लोकांना पाणीपुरवठा होण्यासाठी १९ विहिरी आणि ३२ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. अधिग्रहण विहिरींची संख्या खटाव तालुक्यात सर्वाधिक आहे. तर जिल्ह्यात सध्या १ लाख ३४ हजार नागरिक आणि ८३ हजार पशुधनासाठी टॅंकर सुरू आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीRainपाऊस