शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील उन्हाळी क्षेत्र घटणार; पिकांवर ‘पाणी’ फेरणार

By नितीन काळेल | Updated: February 13, 2024 19:33 IST

सातारा : जिल्ह्यात पाण्याची उपलब्धता वाढल्याने उन्हाळी पीक क्षेत्रात वाढ झाली होती. पण, गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्याने दुष्काळी ...

सातारा : जिल्ह्यात पाण्याची उपलब्धता वाढल्याने उन्हाळी पीक क्षेत्रात वाढ झाली होती. पण, गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्याने दुष्काळी स्थिती उद्भवली आहे. परिणामी कृषी विभागाच्या अंदाजानुसार यंदा उन्हाळी क्षेत्र (ऊस सोडून) पाच हजार हेक्टरपर्यंत राहणार असले तरी प्रत्यक्षात पेरणी कमीच होऊ शकते. यामध्ये भुईमूगच मुख्य पीक राहणार आहे.जिल्ह्यातील शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. जूनमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर चार महिने जिल्ह्यात पाऊस पडतो. यावरच खरीप तसेच रब्बी हंगामही अवलंबून असतो. तसेच पावसाने धरणे आणि तलाव भरल्यानंतर उन्हाळ्यातही शेतकरी विविध पिके घेतात. पण, गेल्यावर्षी पावसाने दगा दिला. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६५ टक्क्यांहून अधिक पर्जन्यमान झाले. त्यामुळे जवळपास ३० टक्के पावसाची तूट राहिली आहे.परिणामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना नुकसान झाले. तसेच आता रब्बी हंगामात पक्व स्थितीत असतानाही पिकांना पाणी मिळणे अशक्य झाले आहे. यामुळे पिकांची उत्पादकता घटणार आहे. याचा फटका लाखो शेतकऱ्यांना बसणार आहे. असे असतानाच आता कृषी विभागाचे उन्हाळी हंगामाकडे लक्ष लागलेले आहे. यासाठी जिल्ह्यात किती क्षेत्र राहणार, याचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने सध्या पूर्णपणे दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामावर परिणाम होणार आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार यंदा उन्हाळी पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र हे ४ हजार ८०३ हेक्टर राहण्याचा अंदाज आहे. यामध्ये भुईमुगाचे २ हजार ६९९ हेक्टर राहू शकते. तसेच मका क्षेत्र २ हजार हेक्टरवर राहण्याचा अंदाज आहे. मक्याचे ३१ हेक्टर राहू शकते. यावर्षी उन्हाळी पिकांना पाणी कमी पडणाार असल्याने क्षेत्रात घट होऊ शकते.गतवर्षी पाच हजार हेक्टरवर पेर..जिल्ह्यात गेल्यावर्षी पाच हजार हेक्टरवर उन्हाळी पेरणी झालेली होती. १०४ टक्के पेरणी झालेली. यामध्ये उन्हाळी भुईमुगाचे २८०० हेक्टरवर क्षेत्र होते. तर उन्हाळी बाजरीचे ९८१ हेक्टर तसेच मकेची पेरणी एक हजार हेक्टरवर झाली होती. सोयाबीन ८० हेक्टरवर घेण्यात आलेले. महाबळेश्वर वगळता सर्वच तालुक्यात उन्हाळी पिके घेण्यात आलेली.

उन्हाळी सोयाबीन क्षेत्रात घट..

मागील दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला बाजारात चांगला दर मिळाला होता. त्यामुळे जिल्ह्यात उन्हाळी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली होती. २०२२ मध्ये उन्हाळ्यात १६०० हेक्टरवर सोयाबीन पीक घेण्यात आलेले. पण, वर्षभरापासून सोयाबीनचा दर उतरल्याने शेतकरी उन्हाळी सोयाबीन घेण्याकडे दुर्लक्ष करु लागलेत. त्यामुळे गेल्यावर्षी उन्हाळ्यात ८० हेक्टरवर सोयाबीन घेतले होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीdroughtदुष्काळ