स्थानिक संस्थांच्या दुर्लक्षामुळे बंधाऱ्यांची दुरवस्था-

By Admin | Updated: July 7, 2015 20:56 IST2015-07-07T20:56:56+5:302015-07-07T20:56:56+5:30

- पाणी अडवा पाणी जिरवा

Due to the neglect of local bodies, | स्थानिक संस्थांच्या दुर्लक्षामुळे बंधाऱ्यांची दुरवस्था-

स्थानिक संस्थांच्या दुर्लक्षामुळे बंधाऱ्यांची दुरवस्था-

सूर्यकांत निंबाळकर-आदर्की --फलटण पश्चिम तालुक्यात १९८२ मध्ये प्रत्येक ओढ्यावर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून पाणी अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, स्थानिक संस्थांनी दुर्लक्ष केल्याने खर्च वाया गेला.सिमेंट बंधाऱ्यावर खर्च केल्याने संताप व्यक्त होत आहे. दुष्काळी भागात शासनाने १९८२ मध्ये प्रत्येक ओढ्यावर कोल्हापूर पद्धतीचे दगडी बांधकाम त्यामध्ये लाकडी किंवा लोखंडी दरवाजे बसवून पाणी अडवले. पण, हे बंधारे देखभाल करण्यासाठी स्थानिक संस्थांकडे ग्रामपंचायतीकडे दिले. त्यांना देखभालीचा निधी मिळत नसल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले. त्याचा फायदा भुरटे चोर व भंगार व्यावसायिकांनी घेऊन फळ्या चोरून नेल्याने कोल्हापूर पद्धतीचा बंधाऱ्याकडे दुर्लक्ष झाले. पाणलोट योजना अंमलात सिमेंट बंधारे, लोखंड, खडी, सिमेंट, वाळू वापरून पक्के बांधकाम करण्याची संकल्पना पुढे आली. पाटबंधारे विभागाने जुना बंधारा पाहूनच नवा बंधारा फक्त १० ते २० मीटरवर बांधला. जुना बंधारा दुरुस्त करण्याची गरज असताना नवीन बांधून जुने बंधारा दुरुस्त करण्याची गरज असताना नवीन बांधून जुने बंधारा पाण्यात बुडाले आहेत. पर्याय उपलब्ध असताना नवीन बंधाऱ्यावर लाखो रुपये खर्च केल्याने संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Due to the neglect of local bodies,