आधुनिक उपचारामुळे कन्यारत्न

By Admin | Updated: April 12, 2016 00:47 IST2016-04-11T22:27:06+5:302016-04-12T00:47:52+5:30

रुपेश काटकर : पंधरा वर्षांनी मिळाले आई-वडील होण्याचं सुख

Due to modern treatment Kanyataratna | आधुनिक उपचारामुळे कन्यारत्न

आधुनिक उपचारामुळे कन्यारत्न

सातारा : ‘आपल्या संसाररूपी वेलीवर एखादं गोंडस फूल उमलावं, ही प्रत्येक पती-पत्नीची अपेक्षा असते. मात्र, ज्यांना हे सुख मिळत नाही, त्यांचं आयुष्य जणू निरस बनलेलं असतं. साताऱ्यातील एका दाम्पत्याला पंधरा वर्षांपासून मूल होत नव्हतं. आधुनिक उपचार तंत्र प्रणालीमुळे त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं आहे,’ अशी माहिती माउली फर्टिलिटी सेंटरचे डॉ. रूपेश काटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. काटकर म्हणाले, ‘अनेक दाम्पत्ये संततीसाठी मोठमोठ्या दवाखान्यांमध्ये महागडे उपचार घेतात. लाखो रुपये खर्चूनही फायदा होत नाही. सातारा येथील सामान्य कुटुंबातील दाम्पत्य संततीप्राप्तीसाठी उपचार घेण्यासाठी आले होते. या अगोदर त्यांनी पुणे, मुंबई येथे नामवंंत फर्टिलिटी सेंटरमध्ये उपचार केले
होते.
तसेच त्यांनी चार वेळा ‘आयव्हीए’म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबी या उपचार प्रणाली प्रयोग राबविला होता, मात्र या उपचारामध्ये यश आले नव्हते. पतीचे वय ५२ तर पत्नीचे वय ४५. लग्न होऊन पंधरा वर्षे उलटलेली. बेताच्या परिस्थितीत पुण्या-मुंबईत उपचार घेऊन आर्थिक परिस्थितीवर ताण आलेला.
अशा बिकट परिस्थितीत हे नैराश्य आलेलं दाम्पत्य माझ्याकडे आले. अगोदर झालेल्या तपासण्या व उपचार पद्धतीनुसार पुन्हा आयव्हीएडटेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला अन् तो यशस्वी ठरला.’ (प्रतिनिधी)


पहिलाच प्रयोग यशस्वी
या दाम्पत्यामधील पत्नीमध्ये स्त्री बिजांची निर्मिती कमी प्रमाणात व कमी गुणवत्ता प्रतीची होत होती. यासाठी आधुनिक उपचार पद्धतीने गुणवत्तापूर्ण स्त्री बीज निर्मितीसाठी प्रयत्न केले. स्त्री बिजांडातील बिजे काढून गर्भाशयाबाहेर गर्भ तयार करण्यात आला. हा तयार झालेला गर्भ पुन्हा गर्भाशयात सोडून रोपण करण्यात आला. हा पहिलाच प्रयोग यशस्वी झाला. बाळंतपण सुखरूप होऊन त्यांना साधारण कन्यारत्न झाले. त्यामुळे संततीपासून वंचित राहणाऱ्या या दाम्पत्याच्या जीवनामध्ये कन्यारत्नाच्या माध्यमातून आशेचा किरण उगवला आहे, असे डॉ. काटकर यांनी सांगितले.

Web Title: Due to modern treatment Kanyataratna