महसूल कर्मचारी बेवारस वाळूच्या राखणीला तलाठ्याची रात्रगस्त : आदर्की-कापशी रस्त्यावर ट्रकमधील बिघाडामुळे वाळू रस्त्यावरच
By Admin | Updated: May 10, 2014 23:41 IST2014-05-10T23:41:34+5:302014-05-10T23:41:34+5:30
आदर्की : आदर्की-कापशी दरम्यानच्या रस्त्यावर ट्रकमध्ये बिघाड झाल्याने संबंधित ट्रकचालक रस्त्यावरच वाळू सांडून गेला. त्यामुळे तलाठी,

महसूल कर्मचारी बेवारस वाळूच्या राखणीला तलाठ्याची रात्रगस्त : आदर्की-कापशी रस्त्यावर ट्रकमधील बिघाडामुळे वाळू रस्त्यावरच
आदर्की : आदर्की-कापशी दरम्यानच्या रस्त्यावर ट्रकमध्ये बिघाड झाल्याने संबंधित ट्रकचालक रस्त्यावरच वाळू सांडून गेला. त्यामुळे तलाठी, कोतवाल यांनी रात्रभर या बेवारस राखण करून सकाळी ती वाळू ट्रॅक्टरमध्ये भरून तहसीलदार कार्यालयात नेण्यात आली. बेवारस रस्त्यावरील वाळूची राखण महसूल विभागाने केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. फलटण-वाठार स्टेशन रस्त्यावर दिवसन्रात्र चोवीस तास ट्रक, टिपर, डंपर, ट्रॅक्टरमधून मोठ्या प्रमाणावर वाळूची वाहतूक केली जाते. मात्र, आदर्की ते कापशी दरम्यान असाच प्रकार पाहायला मिळाला. दोन दिवसांपूर्वी अज्ञात ट्रक मध्ये बिघाड झाला. यामुळे ट्रकचालकाने रस्त्यावरच पूर्ण वाळू टाकून निघून गेला. त्यामुळे रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरूहोती. त्यावेळी फलटण महसूल विभागातील अधिकार्यांना याची माहिती मिळाल्यानंतर गावकामगार तलाठी एस. बी. कदम व कर्मचार्यांना वाळू फलटण कार्यालयात पाठवण्याच्या सूचना केल्या. त्याप्रमाणे तलाठ्यांनी रात्रीच जेसीबीद्वारे वाळू रस्त्यावरून बाजूला केली. फलटण तहसीलदार कार्यालयात वाळू नेण्यासाठी वाहन उपलध न झाल्यामुळे तलाठी व कोतवाल यांना राखण करावी लागली. सकाळी आठच्या सुमारास जेसीबीच्या साह्याने ट्रॅक्टरमध्ये वाळू भरून तहसील कार्यालयात पाठविली. (वार्ताहर)