शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

दुष्काळ पुसणारं पाणी येणार म्हणून मोठं अप्रूप : टेंभू योजनेंतर्गत पाईपलाईनचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 22:20 IST

दुष्काळात भरडणाऱ्या आणि पाण्यासाठी भटकंती करणाºया माण आणि खटाव तालुक्यांतील अनेक गावांची तहान आता सांगली जिल्ह्यातून येणाºया टेंभू योजनेच्या पाण्यातून भागणार आहे. सातारकरांचं हक्काचं पाणी सांगलीतून पुन्हा

नितीन काळेल।सातारा : दुष्काळात भरडणाऱ्या आणि पाण्यासाठी भटकंती करणाºया माण आणि खटाव तालुक्यांतील अनेक गावांची तहान आता सांगली जिल्ह्यातून येणाºया टेंभू योजनेच्या पाण्यातून भागणार आहे. सातारकरांचं हक्काचं पाणी सांगलीतून पुन्हा जिल्ह्यालाच मिळणार आहे. या महत्त्वकांक्षी योजनेंतर्गत माणच्या दक्षिणेकडील १६ गावांना पाणी येणार आहे. त्याच्या पाईपलाईनचे काम सुरू झाले असून, लाभक्षेत्रातील लोक ते पाहण्यासाठी जाऊ लागले आहेत. तर येत्या सहा महिन्यांत काम पूर्ण होऊन ओढ्याला पाणी खळाळून तलाव भरणार आहे.

मूळत: टेंभू उपसा सिंचन योजना ही सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी आहे. या योजनेतून २१८ गावांतील क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यामध्ये कºहाड तालुक्यात एक, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील ३२ गावे आणि सांगली जिल्ह्यातील १८५ च्या आसपास गावांना या योजनेचा फायदा होणार आहे. त्यासाठी २२ टीएमसी पाण्याची आवश्यकता असते. कोयना, तारळी आणि वांग धरणातून हे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यात कोयनेतील सर्वाधिक १८ टीएमसी पाणी या टेंभू योजनेतून सिंचनासाठी दिले जाते. सद्य:स्थितीत ही योजना ५० ते ६० टक्क्यांपर्यंत सुरू झाली आहे. पण, ही योजना सातारा जिल्ह्याच्या सीमेवरून जात असताना त्यातील पाणी माण आणि खटाव तालुक्यांतील गावांना मिळावे, अशी मागणी होती. त्याप्रमाणे अनेकांनी लढा सुरू केला होता. त्याला यश आले आहे.

सातारा जिल्ह्याच्या सीमेवरून जाणाºया टेंभू कालव्याच्या माध्यमातून माण तालुक्यातील १६ गावांसाठी फायदा होणार आहे. या गावांसाठी ०.९२ दलघमी पाणी मिळणार आहे. हे पाणी रोटेशनप्रमाणे सोडण्यात येणार आहे. यामुळे अनेक गावांना लाभ मिळणार आहे. शिवाय हे पाणी महाबळेश्वरवाडी तलावात येणार आहे. या तलावाखाली चार गावांच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी आहेत. त्यामुळे या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकालात निघणार आहे. तसेच बंधाºयातही पाणीसाठा होण्याने विहिरींची पाणी पातळी वाढण्याने काही प्रमाणात शेती पाण्याचाही प्रश्न संपुष्टात येणार आहे. हे पाणी आटपाडी कालव्याच्या किलोमीटर १३ मधून माण तालुक्याला मिळणार आहे.

एकंदरीतच सातारा-सांगली जिल्ह्यांच्या सीमेवरुन जाणाºया या टेंभू योजनेमुळे कायम दुष्काळी असणाºया माण तालुक्यातील अनेक गावांची तहान कायमस्वरुपी भागणार असून, पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ कायम संपलेला असणार आहे.लवकरच होणार उद्घाटन...टेंभू योजनेतून पिण्यासाठी पाणी देण्यात येणार आहे. ९.५० कोटी रुपये त्यासाठी मिळणार आहेत. पाणी सोडण्यासाठी कमी खर्च लागणार आहे. या योजनेचे काम लवकर होऊन काही महिन्यांतच पाणी मिळणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा शेवटचाच हा दुष्काळ असणार आहे. तर काही दिवसांतच मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. काम सुरू झाल्याने उत्साहाचे वातावरण आहे. 

टेंभू सिंचन योजना सोलापूर आणि सांगली जिल्ह्णांसाठी आहे. आता योजनेमधून माण आणि खटाव तालुक्यांतील काही गावांना पिण्यासाठी पाणी देण्यात येत आहे. माण तालुक्यातील गावांसाठी असणाºया कालव्याच्या कामाचे लवकरच उद्घाटन होईल. चार महिन्यांत काम पूर्ण होऊन योजनेचे पाणी सोडण्यात येईल.- हणमंत गुणाले, अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे विभाग 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwater transportजलवाहतूक