शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

थकबाकीदारांचे पाणी बंद होणार, अनधिकृत नळजोड तोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 11:49 AM

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून पाणीपुरवठा होणाऱ्या भागातील जनतेने थकबाकीच्या रकमा तत्काळ भराव्यात तसेच अनधिकृत नळजोड नियमित करुन घ्यावेत, असे आवाहन करण्यात येत आहे. ग्राहकांना यासाठी १५ जानेवारीची मुदत देण्यात आली आहे, त्यानंतर थकबाकीदार व अनधिकृत नळजोड तोडून पाणी बंद केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्दे थकबाकीदारांचे पाणी बंद होणार, अनधिकृत नळजोड तोडणारमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून बिले भरण्यासाठी १५ जानेवारीचा अल्टिमेटम

सागर गुजरसातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून पाणीपुरवठा होणाऱ्या भागातील जनतेने थकबाकीच्या रकमा तत्काळ भराव्यात तसेच अनधिकृत नळजोड नियमित करुन घ्यावेत, असे आवाहन करण्यात येत आहे. ग्राहकांना यासाठी १५ जानेवारीची मुदत देण्यात आली आहे, त्यानंतर थकबाकीदार व अनधिकृत नळजोड तोडून पाणी बंद केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.प्राधिकरणाच्या माध्यमातून गोडोली (शाहूनगर), शाहूपुरी, सदरबझार व खिंडवाडी या चार भागांतील जनतेला लष्कर पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. तब्बल १७ हजार अधिकृत नळजोड आहेत. तर प्राधिकरणच्या अंदाजानुसार २५00 अनधिकृत नळजोडांद्वारे पाणी चोरुन वापरले जाते.पाणीपट्टीची बिले प्रत्येक दोन महिन्याला ग्राहकांना दिली जातात. पाणी पट्टी वसुलीची टक्केवारी तब्बल ७0 टक्के इतकी आहे. तरी देखील ३0 टक्के लोक पाणीपट्टी भरतच नसल्याचे समोर येत आहे. बिले थकवणाऱ्यांमुळे प्राधिकरणावर ताण येतो. आता ही थकबाकीची वसुली करण्यासाठी जोरदार मोहीम राबविण्यात येत आहे.प्राधिकरणतर्फे प्रत्येक भागात रिक्षा फिरवून नागरिकांना पाणीपट्टी भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी ३२ ठिकाणी वसुली व समस्या निवारणाचे बुथ तयार केले आहेत. नागरिकांची या माध्यमातून सोय केली असल्याने त्यांनी वेळेत पाणीपट्टी भरणे अपेक्षित आहे.दरम्यान, १५ जानेवारीपर्यंत थकबाकीदारांना गांधीगिरीमार्गाने समजावले जाईल. मात्र तरीही थकबाकी न भरण्याची मानसिकता दिसून आल्यास नळजोड तोडण्याची कारवाई सुरु करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.प्राधिकरण आपल्या दारीचा प्रयोगजीवन प्राधिकरणच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून विविध भागांत रिक्षाद्वारे जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. पाणी गळतीच्या समस्येबाबतही नागरिकांनी तक्रार करावी. नळजोड नियमित करुन घ्यावेत तसेच पाणीपट्टी भरुन शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्राधिकरण आपल्या दारीच्या या प्रयोगामुळे जनजागृती होताना दिसते.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून ज्या भागात पाणी पुरवठा केला जातो. त्या भागातील अनधिकृत नळजोड नियमित करुन घ्यावेत, थकबाकी भरावी, असे आवाहन नागरिकांना केले आहे. आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो. आता लोकांनीच सहकार्य करणे अपेक्षित आहे.- संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

टॅग्स :WaterपाणीSatara areaसातारा परिसर