शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

दहावीच्या मुलीचा एसटीखाली सापडून मृत्यू, गुढे येथे अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 13:29 IST

तळमावले येथे शाळेला जात असलेल्या एका शाळकरी मुलीचा एसटीच्या पुढील चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ढेबेवाडी-कऱ्हाड मार्गावरील पाटण तालुक्यातील गुढे येथे ही घटना घडली. समृद्धी भरत कदम (वय १५ रा. गुढे, ता. पाटण) असे मृत मुलीचे नाव आहे.

ठळक मुद्देदहावीच्या मुलीचा एसटीखाली सापडून मृत्यू, गुढे येथे अपघात चाकाखाली सापडल्याने अपघात

सणबूर (सातारा) : तळमावले येथे शाळेला जात असलेल्या एका शाळकरी मुलीचा एसटीच्या पुढील चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ढेबेवाडी-कऱ्हाड मार्गावरील पाटण तालुक्यातील गुढे येथे ही घटना घडली. समृद्धी भरत कदम (वय १५ रा. गुढे, ता. पाटण) असे मृत मुलीचे नाव आहे.घटनास्थळावरील ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तळमावले येथील श्री वाल्मिकी विद्यामंदिरात दहावीच्या वर्गात समृद्धी शिकते. मंगळवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी मैत्रिणींसोबत गावाजवळच्या बसथांब्याजवळ आली होती. त्यावेळी ढेबेवाडीकडून कऱ्हाडकडे निघालेली कऱ्हाड आगाराची (एमएच १४ बीटी ३६६५) बस पकडताना ती बसच्या पुढील चाकाखाली सापडली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर घटनास्थळी ग्रामस्थ व नातेवाइकांनी गर्दी केली. येथील पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्यासह सहकारी घटनास्थळी दाखल झाले.समृद्धी अत्यंत हुशार विद्यार्थिनी होती. विद्यालयातील विविध उपक्रमांतून तिचा सहभाग असायचा. तिच्या अपघाती निधनाचे वृत समजताच विद्यालयासह गुढे परिसरावर शोककळा पसरली आहे. अपघाताचा गुन्हा नोंदविण्याची प्रकिया सुरू आहे.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर