पोगरवाडीतील ‘त्या’ उपशिक्षिकेची मान्यता रद्द-लोकमतचा दणका
By Admin | Updated: July 29, 2014 23:01 IST2014-07-29T21:31:38+5:302014-07-29T23:01:42+5:30
जिल्हा परिषदेचा आदेश : शाळेलाही दिली लेखी माहिती

पोगरवाडीतील ‘त्या’ उपशिक्षिकेची मान्यता रद्द-लोकमतचा दणका
सातारा : तालुक्यातील पोगरवाडी येथील श्री रंगशिळा एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील शिक्षणसेविका मेघा शिवाजी माने यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा ठपका जिल्हा परिषदेने ठेवला आहे. त्यांची मान्यता रद्द केल्याचा लेखी आदेश शिक्षण विभागाने काढला असून, संस्थेला लेखी कळविले आहे.
पोगरवाडीच्या शाळेमध्ये मेघा माने यांची शिक्षण सेवकपदी केलेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याची तक्रार पोगरवाडी ग्रामस्थांनी केली होती. जाहिरात न देता तसेच रोस्टर डावलून ही भरती केल्याचेही तक्रारीत नमूद केले होते. त्या अनुषंगाने ‘लोकमत’च्या दि. २१ फेबु्रवारी आणि दि. १ मार्चच्या अंकात बातमी प्रसिद्ध झाली होती.
‘लोकमत’ने त्याचा पाठपुरावाही केला होता. यामुळे वांदग निर्माण झाले आणि त्याची तक्रार जिल्हा परिषदेबरोबर शिक्षण विभागाकडे झाली. चौकशीानंतर शिक्षण विभागाने आदेश काढला असून, यामध्ये ग्रामस्थांची तक्रार, शिक्षणाधिकारी कार्यालयाने संस्थेला दिलेली नोटीस, उपशिक्षणाधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल आणि शिक्षणाधिकारी कार्यालयाकडील मान्यता आदेश त्याचबरोबर टिप्पणी याचा संदर्भ देत मेघा माने यांची नियुक्ती रद्द केल्याचा आदेश काढला आहे. (प्रतिनिधी)