शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रब्बीवर दुष्काळाचे सावट; साताऱ्यात सव्वा लाख हेक्टरवर पेर, पेरणी किती..जाणून घ्या

By नितीन काळेल | Updated: November 23, 2023 18:53 IST

सातारा : जिल्ह्यात खरीपनंतर रब्बी हंगाम मोठा घेण्यात येतो. पण, यंदा पावसाअभावी या हंगामावर दुष्काळाचे सावट आहे. कारण, डिसेंबर ...

सातारा : जिल्ह्यात खरीपनंतर रब्बी हंगाम मोठा घेण्यात येतो. पण, यंदा पावसाअभावी या हंगामावर दुष्काळाचे सावट आहे. कारण, डिसेंबर महिना उजाडत आलातरी वेग नसल्याने आतापर्यंत ५३ टक्के म्हणजे १ लाख १३ हजार हेक्टरवरच पेरणी झालेली आहे. तर भविष्यात पाणी कमी पडण्याच्या भीतीने शेतकऱ्यांत पेरणीबद्दल धाकधूक कायम आहे.जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढत चालले आहे. सध्यस्थितीत १ लाख हेक्टरवर ऊस राहतो. त्यामुळेच जिल्ह्यातील साखर कारखान्यांचीही संख्या वाढत चालली आहे. तरीही जिल्ह्यात खरीप आणि रब्बी असे प्रमुख दोन हंगाम मोठ्या प्रमाणात घेतले जातात. खरीपाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख हेक्टरपर्यंत राहते. तर रब्बीचे २ लाख १३ हजार २४४ हेक्टर निश्चित करण्यात आलेले आहे. सध्या रब्बीच्या हंगामावर दुष्काळाचे सावट गडद आहे. कारण, या हंगामातील सर्वाधिक क्षेत्र हे दुष्काळी तालुक्यात अधिक राहते. यामध्ये माण तालुक्यात ४६ हजार ४१८ हेक्टर असून फलटणला सुमारे ३१ हजार, खटाव २९ हजार ८२१, कोरेगाव २१ हजार २६६, सातारा तालुका १४ हजार ९७०, खंडाळा १४ हजार हेक्टर, पाटण १७ हजार ८०९, कऱ्हाड १४ हजार ७३२, जावळी ८ हजार हेक्टर, वाई १४ हजार ६८९ आणि महाबळेश्वर तालुक्यात ६४५ हेक्टर क्षेत्र आहे. पण, यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यात तरी रब्बीच्या पेरणीवर परिणाम होण्याची भीती आहे. या तालुक्यांत यावर्षी सरासरीच्या ५० ते ६५ टक्क्यांपर्यंतच पाऊस झालेला आहे. त्यामुळे पेरणी केलीतर पुढे पिकांना पाणी मिळणार का ? याची शास्वती नाही. परिणामी शेतकऱ्यांचे पेरणीचे धाडस करत नाहीत.जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख १३ हजार २५१ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. हे प्रमाण ५३.११ टक्के इतके आहे. यामध्ये माण तालुक्यात सुमारे ५८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर खटावमध्ये ६५ टक्के, सातारा ७४, जावळी ३८, पाटण ७० टक्के, कऱ्हाड २१, कोरेगाव ६०, फलटण ३९, खंडाळा ३८, वाई तालुक्यात ४५ आणि महाबळेश्वर तालुक्यात ९ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. या आकडेवारीवरुन दुष्काळी तालुक्याततरी १०० टक्के पेरणी होणार का याविषयी साशंकता व्यक्त होत आहे.

ज्वारीची ८८ हजार हेक्टरवर पेरणी..जिल्ह्यात ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र हे १ लाख ३५ हजार ५३१ हेक्टर आहे. आतापर्यंत प्रत्यक्षात ८८ हजार ५२० हेक्टरवर पेरणी झालेली आहे. त्यातच ज्वारीची पेरणी आॅक्टोबर ते नोव्हेंबरच्या पहिल्या काही दिवसांत करण्यात येते. पाऊस कमी असल्याने यंदा ज्वारीच्या क्षेत्रात घट होण्याचा अंदाज आहे. कारण, ज्वारीचे सर्वाधिक क्षेत्र माणमध्ये ३८ हजार ५३४ हेक्टर आहे. येथे २४ हजार हेक्टरवर ज्वारी पेरणी झाली. यापुढे ज्वारीची पेरणी होणार नाही. तर खटावला २० हजार हेक्टर क्षेत्र असलेतरी सुमारे १४ हजार हेक्टरवर पेर आहे. कोरेगावमध्ये १० हजार ६९४ आणि फलटण तालुक्यात ८ हजार ४१३ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झालेली आहे.

खरीपात १९ हजार हेक्टर क्षेत्र नापेर..जिल्ह्यातील खरीप हंगाम हा पावसाळ्यातच असतो. पण, यंदा जून आणि जुलैमध्येही पाऊस कमी पडला. त्यामुळे याचा परिणाम पेरणीवर झाला. खरीप पेरणी ९३ टक्केच झाली. त्यामुळे १९ हजार हेक्टर क्षेत्र हे नापेर राहिले होते. यामध्ये बाजरीचे क्षेत्र सर्वाधिक होते. पण, सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झालेली.

ओढे काेरडे, विहिरींचा तळ..रब्बी हंगाम प्रामुख्याने दुष्काळी तालुक्यातच मोठ्या प्रमाणात घेण्यात येतो. पण, या तालुक्यातील बहुतांशी ओढे काेरडे पडलेले आहे. विहिरींनी तळ गाठलेला आहे. यामुळे शेतकरी पेरणी करण्यास कचरत आहेत. आता पेरणी केलीतर जानेवारीपासून पिकांना पाणी मिळणे अवघड होऊन जाणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीdroughtदुष्काळ