शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात पूर्व भागात दुष्काळी झळा; जनावरांना चारा नाही; ६० गावांना टँकरने पाणीपुरवठा 

By नितीन काळेल | Updated: August 17, 2023 19:08 IST

शासनाने लवकर चारा छावणी सुरु करण्याची मागणी

सातारा : पश्चिम भागात धो-धो कोसळणारा पाऊस पूर्वेकडे वाट पाहूनही आला नाही. पावसाळ्यातील अडीच महिन्यात ओढ्यालाही पाणी नाही. त्यामुळे आज पूर्व दुष्काळी भागात शेतकऱ्यांची जनावरे जगविण्यासाठी परवड सुरू आहे. त्यामुळे शासनाने लवकर चारा छावणी सुरु करण्याची मागणी होत आहे. तर जिल्ह्यात सध्या ६० गावे आणि ३४५ वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये आणखी वाढ होणार आहे. जिल्ह्यात किमान पाच वर्षांतून एकदातरी पूर्व भागाकडे पर्जनम्यान कमी राहते. यंदाही तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. पावसाळ्याचे अडीच महिने उलटून गेले आहेत. पण, पश्चिम भाग वगळता दुष्काळी भागाकडे वरुणराजाची वक्रदृष्टीच राहिली आहे. त्यातच मागील १० दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्रच दडी आहे. त्यामुळे मोठी धरणेही भरली नाहीत. यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. अशातच दुष्काळी तालुक्यात भीषणता अधिक वाढत चालली आहे. जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. यामुळे बळीराजाची आता परवड सुरू असल्याचे भीषण वास्तव समोर येत आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यात सर्वात अधिक भीषणता ही माण तालुक्यात सुरू आहे. तालुक्यात १०५ गावे असताना त्यातील ४२ गावांना आणि ३०८ वाड्यांना टॅंकरच्या पाण्याचा आधार आहे. यावर जवळपास ७० हजार नागरिकांची तहान अवलंबून आहे. या लोकांना आणि जनावरांना ४८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तरीही पुरेसे पाणी मिळत नाही. परिणामी पाण्यासाठी रानोमाळ भटकंतीची वेळ लोकांवर आलेली आहे. त्याचबरोबर खटाव तालुक्यात टंचाईची स्थिती कमी आहे. चार गावांत टंचाई असून साडे हजार नागरिकांना चार टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. फलटण तालुक्यातीलही ६ गावे आणि ३७ वाड्यांची तहान टॅंकरच्या पाण्यानेच भागत आहे. तालुक्यातील १४ हजार जनावरांनाही टॅंकरच्याच पाण्याचा आधार आहे. कोरेगाव तालुक्यातही ६ गावांत टंचाई निर्माण झालेली आहे. या गावांसाठी तीन टॅंकर सुरू आहेत. तर वाई तालुक्यातील दोन गावांसाठी टॅंकर सुरू आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यात टंचाई आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdroughtदुष्काळWaterपाणी