शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लिंब खिंड 'आयटी पार्क'साठी ड्रोन सर्वेक्षण, सातारा जिल्ह्यातील युवकांच्या आशा पुन्हा पल्लवित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 17:13 IST

तब्बल ४२ हेक्टरमध्ये प्रकल्प 

सातारा : अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या सातारा आयटी पार्कबाबत शासनाकडून सकारात्मक पावले उचलली गेली आहेत. शुक्रवारी प्रस्तावित आयटी पार्कसाठी नागेवाडी, लिंब खिंड येथील ४२ हेक्टर जागेचा एमआयडीसीकडून ड्रोन सर्व्हे करण्यात आला. सर्व्हेचा अहवाल एमआयडीसीकडून प्राप्त झाल्यानंतर शासन अधिसूचना काढणार आहे. यामुळे जिल्हावासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.सातारा जिल्ह्यातील हजारो तरुण पुण्यात नोकरीसाठी स्थायिक आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील युवकांना जिल्ह्यातच रोजगार निर्माण झाला पाहिजे, यासाठी आयटी पार्कची अनेक वर्षांपासून मागणी होत होती. या अनुषंगाने खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्र शासनाकडे, तर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.मंत्री सामंत यांनीही त्यासाठी एप्रिल २०२५ मध्ये लिंब खिंडीत आयटी पार्क सुरू होईल, अशी ग्वाही साताऱ्यात एका कार्यक्रमात दिली होती. यासाठी जागेची अडचण होती, त्यावर महसूल विभागाची लिंब खिंड येथे असलेली सुमारे ४२ हेक्टर जागेचा पर्याय समोर आला. ही मोठी जागा राष्ट्रीय महामार्गानजीक असल्यामुळे सोयीस्कर आहे. यामुळे याठिकाणी आयटी पार्क व्हावे, अशी यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. महसूल विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यामुळे जागेच्या हस्तांतरणाचा प्रश्न सुटला. त्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया वेगाने सुरू झाली.शुक्रवारी (दि. २९) या जागेचे ड्रोन सर्व्हेक्षण करण्यात आले. आता अधिसूचना निघण्याची प्रतीक्षा आहे. अधिसूचना मिळताच हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. यानंतर साताऱ्यात आयटी पार्कच्या कामाला प्रत्यक्ष गती मिळेल. साताऱ्यात आयटी उद्योगाची दारे खुली होणार असल्यामुळे तरुणाईत उत्साहाचे वातावरण आहे.

नामांकित कंपन्या येण्याची गरजआयटी पार्क होत असताना याठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, या अनुषंगाने मोठ्या नामांकित कंपन्यांनी गुंतवणूक करण्याची गरज आहे. यासाठी आयटी हबला आवश्यक असे पोषक वातावरण, पायाभूत सुविधा, त्याठिकाणी उपलब्ध करण्याची गरज आहे.

लिंब खिंडीतील ४२ हेक्टर जागेचा ड्रोन सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. सर्व्हेचा अहवाल एमआयडीसी मुख्यालयाकडून प्रस्ताव उद्योग विभागाकडे सादर केला जाईल. उद्योग विभागाकडून अधिसूचना काढल्यानंतर एमआयडीसीमार्फत आयटी पार्कसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उभारल्या जातील. - अमितकुमार सोंडगे, एमआयडीसी, प्रादेशिक अधिकारी 

प्रकल्पामुळे साताऱ्यातील विद्यार्थ्यांना नोकरीसाठी पुणे-मुंबईकडे धाव घेण्याची गरज भासणार नाही. जिल्ह्यातील तरुणांना जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात. आयटी प्रकल्पामुळे यास मोठा हातभार लागेल. तसेच कन्व्हेंशन सेंटर उभारणीचाही प्रस्ताव देण्यात येईल. - शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाममंत्री