चालक धाकात; गाडी स्थानकात..!

By Admin | Updated: December 2, 2014 00:26 IST2014-12-01T22:57:55+5:302014-12-02T00:26:28+5:30

उंब्रजमध्ये कारवाई : ७५ वाहनांकडून दहा हजार रुपये दंड वसूल

Driver's money; At the train station ..! | चालक धाकात; गाडी स्थानकात..!

चालक धाकात; गाडी स्थानकात..!

उंब्रज : उंब्रज बसस्थनकात एसटी येण्यासाठी उंब्रज ग्रामपंचायत व उंब्रज पोलिसांनी राबविलेला उपक्रम आज (सोमवारी) शंभर टक्के यशस्वी ठरला; परंतु एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक एसटी गाड्या बसस्थानकात न जाता महामार्गावरच थांबत असल्यामुळे पोलिसांना एसटीवरही दंडात्मक कारवाई करावी लागली. दिवसभरात ७५ वाहनांकडून जवळपास दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
सोमवारी सकाळपासून पोलिसांनी क्रेनच्या साह्याने उपमार्गावर उभी केलेली वाहने उचलण्यास सुरुवात केली. ही वाहने थेट उंब्रज पोलीस ठाण्यात नेली जात होती. दुचाकी वाहनांकडून २०० रुपये तर चारचाकी वाहनांकडून पाचशे रुपये दंड घेतला जात होता. दिवसभर ही क्रेन पोलिसांसह उपमार्गावरून फिरत होती. यामुळे पूर्ण उपमार्ग रिकामा झाला होता. ज्या एसटी गाड्या बसस्थानकात येत होत्या, त्या विना अडथळ्याच्या सुसाट जात होत्या.
व्यापारी, ग्रामपंचायत व पोलिसांकडून आजपासून एसटी बसस्थानकात या मोहिमेला साथ मिळत असताना अनेक एसटीचे चालक एसटी बसस्थानकात आणण्याबाबत टाळाटाळ करत होते. यामुळे महामार्गावर उभ्या केलेल्या एसटीवर पोलिसांनी ‘नो पार्किंग’ची कारवाई केली.
यावेळी एसटी चालक व पोलीस यांच्यात तू-तू मै-मै ही झाल्याचे दिसून येत होते; परंतु पोलिसांनी कडक भूमिका घेत संबधित एसटी चालकांवरही दंडात्मक कारवाई केली. (प्रतिनिधी)

मोहिमेबद्दल समाधान
उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची दिवसभरात ७५ वाहनांवर कारवाई केली. ही कारवाई अशीच एसटी महामंडळानेही आगाराच्या चालकांना सूचना देऊन एसटी बसस्थानकात आणण्याबाबत सांगावे, अशी मागणी उंब्रजकरांच्या वतीने होत आहे.



उंब्रज ग्रामपंचायतीने व्यापाऱ्यांना नोटिसा दिल्या होत्या. व्यापाऱ्यांना स्वत:हून पुढे येऊन आपली अतिक्रमणे काढली आहेत. परंतु, काही अतिक्रमणे अजूनही राहिली आहेत, तीही काढून घ्यावीत. यामुळे या चांगल्या कामाला सहकार्य होईल.
- सुधाकर जाधव, ग्रामपंचायत सदस्य

उंब्रज पोलिसांनी उपमार्गावर राबविलेल्या मोहिमेमुळे अनेक वर्षांनी उपमार्ग रिकामा दिसला. आता एसटी महामंडळानेही आपल्या चालकांना कडक सूचना देणे गरजेचे आहे, म्हणजे हा उपक्रम पूर्ण यशस्वी होईल.
- विकास जाधव

Web Title: Driver's money; At the train station ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.