केळघर घाटरस्त्यात चालकांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:23 IST2021-09-02T05:23:15+5:302021-09-02T05:23:15+5:30

चालकांची कसरत मेढा : मेढा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटरस्त्याची पावसामुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या ...

Driver's exercise in Kelghar Ghat Road | केळघर घाटरस्त्यात चालकांची कसरत

केळघर घाटरस्त्यात चालकांची कसरत

चालकांची कसरत

मेढा : मेढा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटरस्त्याची पावसामुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामामुळे रस्ता जागोजागी खोदण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे हा केळघरजवळीच रस्ता दोन महिन्यांपूर्वी वाहूनही गेला होता. काही प्रमाणात या रस्त्याची डागडुजी करण्यात आल्याने वाहतूक सुरू झाली असली तरी वाहनधारकांची परवड काही थांबलेली नाही. रस्ता वाहतुकीयोग्य नसल्याने अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत.

व्हॉल्व्हला गळती;

पाण्याचा अपव्यय

सातारा : सातारा पालिकेच्या जुन्या प्रवेशद्वाराजवळ एका व्हॉल्व्हला गेल्या अनेक दिवसांपासून गळती लागली आहे. दररोज सायंकाळी सहानंतर या व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. हा व्हॉल्व्ह भर रस्त्यात असल्याने याचा वाहतुकीलादेखील अडथळा निर्माण होत आहे. शनिवार पेठ, कूपर कारखाना, बुधवार पेठ, देवी चौक येथील व्हॉल्व्हलाही मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. पालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेऊन पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

कास तलावाचा

परिसर बहरला

पेट्री : जागतिक वारसा स्थळात समाविष्ट झालेल्या कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू झाल्याने पर्यटकांची पावले कासकडे वळू लागली आहे. येथील रंगीबेरंगी फुलांचे गालीचे पर्यटकांचे लक्ष वेधू लागले आहेत. पांढऱ्या शुभ्र कमळांच्या फुलांनी बहरणारा कुमुदिनी तलावही पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. ‘फुलोत्सव’ पाहण्यासाठी येणारे पर्यटक कास तलावाला भेट देत असून, येथील निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत.

Web Title: Driver's exercise in Kelghar Ghat Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.