वाहनचालकांना अडवून गजाने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:47 IST2021-09-07T04:47:10+5:302021-09-07T04:47:10+5:30
मसूर : कांबिरवाडी, ता. कऱ्हाड हद्दीत मसूर ते उंब्रज रस्त्यावर मसूर रेल्वे गेटजवळ मंगळवार रोजी रात्री बाराच्या सुमारास ...

वाहनचालकांना अडवून गजाने मारहाण
मसूर : कांबिरवाडी, ता. कऱ्हाड हद्दीत मसूर ते उंब्रज रस्त्यावर मसूर रेल्वे गेटजवळ मंगळवार रोजी रात्री बाराच्या सुमारास दुचाकी स्वार व एक ट्रक चालकास अडवून त्यांना लोखंडी रॉड व काठीने मारहाण करण्यात आली. त्यांना जिवे मारण्याचा धाक दाखवून दुचाकीस्वारकडील पैसे काढण्याचा प्रयत्न केला व ट्रक चालकास लोखंडी रोड व काठीने मारहाण करून त्याच्या खिशातील दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. यातील आरोपी हे गुन्हा घडल्यापासून फरार झाले होते. त्यांचा कोणताही ठावठिकाणा मिळत नव्हता तांत्रिक व माहितीचे आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांचे मार्गदर्शनाखाली मसूर पोलीस दूर क्षेत्राचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधित आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली व सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, सहायक फौजदार अनिल पाटील, आबा जगदाळे, पोलीस हवालदार राजेंद्र साळुंखे, पोलीस नाईक युवराज पवार, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा साळुंखे, वैभव डांगरे, प्रशांत पवार, अमोल देशमुख यांनी केली आहे. अमर तानाजी कांबळे, सूरज अशोक कांबळे, अभिजित अधिक माने (सर्व रा. मसूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील तपास करीत आहेत.