पोलिसाच्या दुचाकीला धडक देऊन कारचालक पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:26 IST2021-06-11T04:26:46+5:302021-06-11T04:26:46+5:30

सातारा : गोडोलीनाका परिसरात पेट्रोलिंग करत असलेल्या बिटमार्शल पोलिसाच्या दुचाकीला धडक देऊन कारचालक पसार झाला. यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल ...

The driver passed by hitting a police two-wheeler | पोलिसाच्या दुचाकीला धडक देऊन कारचालक पसार

पोलिसाच्या दुचाकीला धडक देऊन कारचालक पसार

सातारा : गोडोलीनाका परिसरात पेट्रोलिंग करत असलेल्या बिटमार्शल पोलिसाच्या दुचाकीला धडक देऊन कारचालक पसार झाला. यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल आणि होमगार्ड जखमी झाले. संबंधित कारचालक ऋतिक जितेंद्र शिंदे याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी, गोडोलीनाका परिसरात पोलीस कॉन्स्टेबल निलेश निकम हे बिटमाशल म्हणून दि. ८ रोजी रात्री गोडोलीनाका परिसरात रात्रगस्तीवर होते. ते मोटारसायकलवरून होमगार्डसोबत गस्तीवर असतानाच ऋतिक जितेंद्र शिंदे (वय २१, रा. साईबाबा मंदिरानजीक गोडोली) हा कारमधून (एमएच १५ बीएक्स १२४१) भरधाव वेगात तेथे आला. त्याने पो.कॉ. निकम यांच्या दुचाकीला उजव्या बाजूने धडक दिली व पसार झाला. यामध्ये दोघेही जखमी झाले तसेच दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले. याप्रकरणी ऋतिक शिंदे याच्यावर अपघातप्रकरणी तसेच विनाकारण रस्त्यावर फिरून जिल्हाधिका-यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: The driver passed by hitting a police two-wheeler