चालकाचा ताबा सुटून ट्रक पुलावरून नाल्यात उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:44 IST2021-08-25T04:44:20+5:302021-08-25T04:44:20+5:30
मलकापूर : चालकाचा ताबा सुटून ट्रक पुलावरून नाल्यात उलटून झालेल्या अपघातात चालक जखमी झाला आहे. खोडशी हद्दीत मंगळवारी सकाळी ...

चालकाचा ताबा सुटून ट्रक पुलावरून नाल्यात उलटला
मलकापूर : चालकाचा ताबा सुटून ट्रक पुलावरून नाल्यात उलटून झालेल्या अपघातात चालक जखमी झाला आहे. खोडशी हद्दीत मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात वाहनांसह मालाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, चालक दारूच्या नशेत असल्यामुळे अपघात झाल्याची चर्चा घटनास्थळी होती. हरिभाऊ शेशराव मलिशे (वय २८, रा. रचनावडी) असे अपघातातील जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चालक हरिभाऊ शेशेराव मलिशे हे माल भरलेला ट्रक (केए ०१ एएल ४५२७) हा पुण्याहून बंगळूरकडे निघाला होता. पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावरून जात असताना खोडशी हद्दीत आला असता चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने मोरीवरील पुलावरून पुलाखाली नाल्यात उलटला. या अपघातात ट्रकसह मालाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या अपघातात चालक जखमी झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील, अशोक जाधव यांच्यासह पोलीस कर्मचारी व देखभाल विभागाचे कर्मचारी दस्तगीर आगा, जितेंद्र भोसले, मोहन मिसाळ, धनंजय घारे, कराड शहर पोलीस स्टेशनचे खालीद इनामदार व प्रशांत जाधव हे त्वरित अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी जखमीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवून दिले. क्रेनच्या साह्याने गाडी काढून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. अपघाताची शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून हवालदार प्रशांत जाधव तपास करत आहेत.
फोटो २४मलकापूर-अॅक्सिडेंट
खोडशी हद्दीत चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने मोरीवरील पुलावरून ट्रक नाल्यात उलटून ट्रकसह मालाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. (छाया माणिक डोंगरे)
240821\1847-img-20210824-wa0020.jpg
फोटो कॕप्शन
चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने मोरीवरील पुलावरून ट्रक पुलाखाली नाल्यात पलटी झाल्याने ट्रकसह मालाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. (छाया माणिक डोंगरे)