शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Satara: चालकाचा ताबा सुटून जानुगडेवाडीनजीक एसटी बसची झाडाला धडक, विद्यार्थ्यांसह ३० जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 11:46 IST

चौघांची प्रकृती गंभीर: जानुगडेवाडीनजीक घडली घटना

रवींद्र मानेढेबेवाडी: खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला वाचविताना एसटी बस चालकाचा ताबा सुटून बस झाडावर धडकल्याने ३० जण जखमी झाले. जानुगडेवाडीनजीक एका धोकादायक वळणावर आज, गुरुवारी सकाळी हा अपघात झाला. जखमींमध्ये शालेय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. चार जण गंभीर असल्याने त्यांना कराड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर इतर जखमींवर ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत माहिती अशी, पाटण डेपोची एसटी बस सळवे येथून पाटणकडे निघाली होती. दरम्यान, जानुगडेवाडीनजीक कराड कडून येणारी खासगी प्रवासी बस अचानकपणे समोरुन भरधाव वेगाने आल्याने बस चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याकडेच्या झाडावर धडकली. यामध्ये बस चालकासह तीसजण जखमी झाले. किरकोळ जखमी विद्यार्थीअपघात झाल्यानंतर पळून गेले.जखमींमध्ये चालक आरिफ निजाम मुल्ला (वय-५७ रा. कोळे), वाहक आर. एम. काळे (५७ रा.मालदन), सरिता धनाजी जाधव (वय ५३) सीताबाई नायकु मगरे (६१) रंजना सुरेश मगरे (५८) बाळाबाई शिवाजी मगरे (५८) शोभा भगवान मगरे (५०) निर्मला अशोक मगरे (४२) शोभा परशुराम जाधव (६५) शारदा सोनवणे (५०) छाया तानाजी जाधव (४४) धनाजी अंतू जाधव (५८, सर्व रा. सणबूर ता.पाटण), तुकाराम ज्ञानू भाईगडे (५९), तुकाराम गणपती यादव (५०) संपदा हनुमंत पुजारी (५०), शारदा सुरेश परीट (५०), यश जालिंदर बोरगे (१७) रोहिणी राजाराम गुरव (सर्व रा. सळवे),  जिजाबाई जयसिंग चोरगे (७०), सुमन वसंत चोरगे (६०, सर्व रा. शिंदेवाडी), कमल शिवाजी जगदाळे (६०), बाळू नाना साळुंखे (५६), पल्लवी सुमित पवार (२६), सीताबाई वसंत लोहार (५०), श्रावणी सतीश पाटील (१५), आराध्या सतीश पाटील (१३), प्रगती रवींद्र पाटील (१५), समर्थ विक्रम जगदाळे (१९, सर्व रा. बनपुरी) मालन बाळासो साळुंखे (६४), जया बाळासाहेब साळुंखे (६८ सर्व रा. महिंद) यांचा समावेश आहे. 

यापैकी निर्मला अशोक मगरे, पल्लवी अमित पवार, संभाजी सिताराम कुंभार हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कराडला हलवण्यात आले आहे. अपघाताची नोंद ढेबेवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे. अपघातानंतर जखमींच्या मदतीसाठी सामाजिक कार्यकर्ते अजित मोहिते, मनोज मोहिते, नानासाहेब साबळे, सचिन जाधव, आदिंनी सहकार्य केले.