दरोडेखोरांची कºहाडमध्ये काढली धिंड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 04:57 IST2017-08-16T04:57:03+5:302017-08-16T04:57:06+5:30
गोळीबार करून पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाºया टोळीच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांची दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी रविवारी सकाळी त्यांची धिंड काढली.

दरोडेखोरांची कºहाडमध्ये काढली धिंड!
कºहाड (जि. सातारा) : गोळीबार करून पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाºया टोळीच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांची दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी रविवारी सकाळी त्यांची धिंड काढली. पोलीस ठाण्यापासून न्यायालयापर्यंत त्यांना चालवत नेण्यात आले.
२० ते २५ सशस्त्र पोलिसांसह बुरखा घातलेले आणि बेड्या ठोकलेले दरोडेखोर मुख्य बाजारपेठेतून जात असताना त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. अक्षय भारत कावरे (रा. अपशिंगे, सांगली), अनमोल जीवनसिंग शर्मा (रा. हसी, हरियाणा), दीपक रामराज गर्ग (रा. पैकरहेडी, हरियाणा), ईश्वरसैनी राजकुमारसैनी (रा. पिहोवा, हरियाणा) व महेंद्र सूर्यग्यान गुजर (रा. बाबुधाम, नवी दिल्ली) यांनी कºहाड तालुक्यातील वडगाव हवेली येथे शुक्रवारी रात्री दत्तकृपा पेट्रोल पंपावर दरोडा टाकला होता. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना अटक केली.