शिरवळला डॉ. साठे यांचे व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:24 IST2021-07-03T04:24:21+5:302021-07-03T04:24:21+5:30

शिरवळ : येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. प्रशांत साठे यांचे ...

Dr. Shirwal. Lecture by Sathe | शिरवळला डॉ. साठे यांचे व्याख्यान

शिरवळला डॉ. साठे यांचे व्याख्यान

शिरवळ : येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. प्रशांत साठे यांचे आभासी व्याख्यान झाले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या सदस्या विद्या देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षणावर मार्गदर्शन केले. रौप्यमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त शाळेने चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. खंडाळा पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. समन्वयक शुभदा कुलकर्णी यांनी शाळेचा इतिहास सर्वांसमोर मांडला. शालेय समिती प्राध्यापिका चित्रा नगरकर यांनी अध्यक्षीय भाषण केले.

संगीत शिक्षक अजय धुमाळ यांनी स्वरचित स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब व विनोद मोहिते यांनी केले. सुजाता दळवी यांनी आभार मानले.

.............

Web Title: Dr. Shirwal. Lecture by Sathe