डॉ. अजितकुमार जाधव यांना शिवाजी विद्यापीठाची संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:39 IST2021-03-17T04:39:46+5:302021-03-17T04:39:46+5:30
नागठाणे : येथील आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज मधील इतिहास विभागप्रमुख डॉ. अजितकुमार जाधव यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरने संशोधन ...

डॉ. अजितकुमार जाधव यांना शिवाजी विद्यापीठाची संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता
नागठाणे : येथील आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज मधील इतिहास विभागप्रमुख डॉ. अजितकुमार जाधव यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरने संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली. यामुळे त्यांना एम. फिल व पीएच. डी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येणार आहे. डॉ. जाधव यांनी ‘१८५७ चे महाराष्ट्रातील उठाव: चिकित्सक अभ्यास’ या विषयावर पी.एचडी संशोधन केले असून त्यांनी ‘माधवराव जाधव : एक ऐतिहासिक अभ्यास’ या विषयावर युजीसी मान्यताप्राप्त प्रोजेक्ट पूर्ण केला आहे. त्यांनी आतापर्यंत सहा ग्रंथाचे लेखन, नऊ ग्रंथाचे सहसंपादन, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील दूर शिक्षण विभागामार्फत प्रकाशित चार ग्रंथात लेखनही केले आहे. मराठी विश्वकोशामध्येही लेखन कार्य केले असून त्यांचे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर २१ शोध निबंध प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल प्राचार्य अभयकुमार साळुंखे, प्राचार्या शुभांगी गावडे, प्राचार्य डाॅ. राजेंद्र शेजवळ, डाॅ. युवराज भोसले, प्राचार्य डॉ. अशोक करांडे, डॉ. अरुण भोसले, प्राचार्य डॉ. विजयराव नलावडे, डॉ. अवनिश पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य व शिवाजी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डाॅ. जे. एस. पाटील, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.