शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वडूजचे डॉ. भंडारे यांचा चारचाकीच्या अपघातात जागीच मृत्यू, संरक्षक कठडे नसल्याने अपघातात वाढ

By जगदीश कोष्टी | Updated: September 3, 2022 18:52 IST

आधारकार्डवरील पत्त्यामुळे नागरिकांनी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली

वडूज : भिगवण-मिरज राज्यमार्गावर खटाव तालुक्यातील धोंडेवाडी हद्दीत चारचाकी वाहन ओढ्यातील झाडावर आदळल्याने वडूजचे डॉ. प्रसन्न भंडारे यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवार, दि. ३ रोजी सकाळी अकराच्या सुमारास झाला.घटनास्थळ व नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. भंडारे हे मायणी येथील रुरल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद रिसर्च सेंटर अँड हॉस्पिटल या मेडिकल कॉलेजमध्ये अधिव्याख्याता म्हणून कार्यरत होते. शनिवारी सकाळी मायणीहून वडूजला येताना अकराच्या सुमारास धोंडेवाडी हद्दीत थोरातवस्ती जवळील विठ्ठल थोरात यांच्या मालकीच्या शेतानजिक असणाऱ्या एका ओढ्याला लागून असलेल्या झाडावर डॉ. भंडारे यांची चारचाकी (एमएच ११ बीव्ही ९०७४) जोरात आदळली. त्यामध्ये चारचाकीचे मोठे नुकसान होऊन वाहनाचा चेंदामेंदा झाला.अपघातात डॉ. भंडारे यांच्या छाती, बरगड्या व हृदयाला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या आवाजाने नजिकच्या काही नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन ओढ्यातील बाभळीच्या झाडावर आदळून पलटी झालेली चारचाकी पुन्हा उभी करून डॉ. भंडारे यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासमवेत असणाऱ्या आधारकार्डवरील पत्त्यामुळे नागरिकांनी येथे संपर्क साधून अपघाताची माहिती दिली.घटनास्थळी मेडिकल कॉलेजचे पदाधिकारी, कर्मचारी, पोलीस व नागरिकांनी तातडीने धाव घेतली. मृत डॉ. प्रसन्न हे प्रख्यात आयुर्वेदतज्ञ व माऊली आयुर्वेद व पंचकर्म सेंटरचे संचालक डॉ. किशोर भंडारे यांचे चिरंजीव होत. डॉ. प्रसन्न यांनी आयुर्वेदातील एम.डी.चे शिक्षण पूर्ण केले असून ते वैद्यकीय व्यवसायाबरोबरच मायणी येथे आयुर्वेद महाविद्यालयात अध्यापनास जात होते. ते वडूज मेडीकल असोसिएशन व निमा या वैद्यकीय संस्थांचे सक्रीय सदस्य होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगी, बंधू असा परिवार आहे. ही अपघाताची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात