डॉ. आंबेडकर जयंती महाबळेश्वरमध्ये साधेपणाने साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:40 IST2021-04-16T04:40:11+5:302021-04-16T04:40:11+5:30

महाबळेश्वर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती महाबळेश्वरमध्ये साधेपणाने साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ...

Dr. Ambedkar Jayanti celebrated simply in Mahabaleshwar | डॉ. आंबेडकर जयंती महाबळेश्वरमध्ये साधेपणाने साजरी

डॉ. आंबेडकर जयंती महाबळेश्वरमध्ये साधेपणाने साजरी

महाबळेश्वर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती महाबळेश्वरमध्ये साधेपणाने साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विविध मान्यवरांनी अभिवादन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करता साधेपणाने जयंती साजरी करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाबळेश्वरमध्ये देखील जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आकर्षक फुलांची सजावट, विद्युत रोषणाईसह रांगोळी काढण्यात आली होती. सकाळी नगरपरिषदेच्यावतीने नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, नगरसेवक कुमार शिंदे, जेष्ठ नगरसेवक किसनशेठ शिंदे, मुख्याधिकारी पल्लवी पाटील आदींच्याहस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच अर्बन बँकेचे अध्यक्ष सचिन धोत्रे, उपाध्यक्ष नंदकुमार वायदंडे, माजी अध्यक्ष, संचालक राजेश कुंभारदरे, दत्तात्रय वाडकर यांच्यासह संचालकांच्या उपस्थितीत पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

तसेच शिवसेनेच्यावतीने शहरप्रमुख राजू गुजर, भाजपच्या उषा ओंबळे, भीमनगरचे ज्येष्ठ नागरिक उत्तम भालेराव, बुद्धिष्ठ प्रेरणा ग्रुपचे किरण शिंदे, माजी उपनगराध्यक्षा छायाताई शिंदे आदींनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पुतळा परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: Dr. Ambedkar Jayanti celebrated simply in Mahabaleshwar