शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जातनिहाय जनगणना होईल की नाही याबाबत शंका, काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केली भिंती

By प्रमोद सुकरे | Updated: May 23, 2025 15:29 IST

स्पष्ट संकेत नाहीत, जनगणना कोणत्या एजन्सीमार्फत करणार ते सांगा

प्रमोद सुकरे कऱ्हाड : केंद्र सरकारने केलेली जातनिहाय जनगणनेची घोषणा राहुल गांधी यांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे शक्य झाली आहे. परंतु, केंद्र सरकारकडून अद्याप स्पष्ट निर्देश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ही जनगणना होईल की नाही? यावर ओबीसी काँग्रेस सेलमध्ये शंका आहे. राहुल गांधींमुळेच जातनिहाय जनगणनेची घोषणा झाल्याने जुन महिन्यात छत्रपती संभाजीनगर येथे त्यांचा सत्कार करुन सरकारविरोधी आंदोलनाचा श्रीगणेशा केला जाणार असल्याची माहिती काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी दिली.येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय तडाखे, विभक्त जाती भटक्या जमाती जिल्हाध्यक्ष आनंदराव जाधव, ओबीसी माळी महासंघाचे राज्य अध्यक्ष संजय माळी, ओबीसी कराड उत्तर अध्यक्ष दत्तात्रय काशीद, अनुसूचित जाती विभाग उपाध्यक्ष रामभाऊ पवार उपस्थित होते.माळी म्हणाले, केंद्र शासनाने जातनिहाय जनगणनेची घोषणा केली असली तरी त्यात अनेक गोष्टींची अस्पष्टता आहे. जनगणना कोणत्या एजन्सीमार्फत करणार, त्यात कोणत्या जातींना समाविष्ट करणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवणे गरजेचे आहे. परंतु, अद्याप त्याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही. ओबीसी समाजाची निव्वळ फसवणूक अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या होत्या. त्या घेण्याबाबतचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने या निवडणुका त्वरित घोषित करून त्या बॅलेट पेपरवर घ्याव्यात. केंद्रीय वित्त आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना सहा वर्षे निधी मिळालेला नाही. ओबीसी समाजात अनेक घटकांसाठी विविध महामंडळे घोषित केली, परंतु कोणत्याही महामंडळासाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग, स्वतंत्र कार्यालय, विशेष आर्थिक तरतूद केलेली नाही. त्यामुळे ओबीसी समाजातील घटकांची ही निव्वळ फसवणूक आहे.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा फेल प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी वसतीगृहे उभारण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने ओबीसी विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी झाली आहे. सरकारने सातत्याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली, ती पूर्णपणे फेल झाली आहे. मध्य प्रदेशच्या दोन्ही मंत्र्यांनी देशाची कर्नल सोफीया कुरेशी आणि सैनिकांबद्दल काढलेले वक्तव्य अत्यंत निषेधार्ह असताना सुद्धा सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करीत नाही. ‘वन नेशन वन इलेक्शन’ ही संकल्पना अत्यंत चुकीची असून, देशाच्या दृष्टीने ती अत्यंत धोकादायक आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcongressकाँग्रेसBJPभाजपाOBCअन्य मागासवर्गीय जाती