शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

कोयना धरणाचे दरवाजे केले बंद - : पाऊस मंदावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 20:43 IST

सातारा जिल्ह्यात सर्वत्र पावसाने विश्रांती घेतल्याने जनजीवन पूर्वपदावर आले आहे. तसेच पश्चिम भागामध्ये मशागतीचे काम शेतकऱ्यांनी हाती घेतले आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत १५ हजार २१६ मिलिमीटर पावसाची नोंद

सातारा : पावसाचा जोर कमी झाल्याने कोयना धरणाचे दरवाजे शुक्रवारी (दि. १६) दुपारी सव्वातीन वाजता बंद करण्यात आले. शुक्रवारी संपूर्ण दिवसभरामध्ये कोयना धरण परिसरात १४, महाबळेश्वरात ३१ तर नवजामध्ये ७ मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यात सर्वत्र पावसाने विश्रांती घेतल्याने जनजीवन पूर्वपदावर आले आहे. तसेच पश्चिम भागामध्ये मशागतीचे काम शेतकऱ्यांनी हाती घेतले आहे. शुक्रवारी बहुतांश ठिकाणी सूर्यदर्शन झाले. कण्हेर तसेच वीर या धरणांतील विसर्ग पूर्णत: थांबवला आहे. धोम, वीर, वांग-मराठवाडी या धरणांच्या परिसरात शुक्रवारी पाऊसच झाला नाही.

दरम्यान, कोयना धरणात ९८.९० टीएमसी, धोममध्ये १२.७७, बलकवडीमध्ये ३.७५, कण्हेरमध्ये ९.४४, उरमोडीत ९.६५, वीरमध्ये ९.७६७, तारळीमध्ये ४.९८८, वांग -मराठवाडीत १.०६३ टीएमसी इतका पाणीसाठा झालेला आहे.महाबळेश्वरात सर्वाधिक पाऊसयंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरमध्ये पडला. ६ हजार १२५ मिलिमीटर इतक्या मोठ्या पावसाची आतापर्यंत नोंद झाली आहे. १ जून ते १६ आॅगस्ट या कालावधीमध्ये १ हजार ५२९ इतकी पावसााची सरासरी इतकी असून, महाबळेश्वरात सरासरीच्या सहापट पाऊस झाला आहे.तालुकानिहाय पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणेसातारा : ५.५५जावळी : १पाटण ५.५५कºहाड : ०.४६कोरेगाव : ०.५६खटाव : ०.३६माण : ०फलटण : ०.२२खंडाळा : ०.३५वाई : ०.१४महाबळेश्वर : ३७.३५

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरण