विषारी वृत्तीला आयुष्यात थारा देऊ नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:14 IST2021-02-05T09:14:05+5:302021-02-05T09:14:05+5:30
कुसूर, ता. कऱ्हाड येथील दानशूर बंडो गोपाळा कदम ऊर्फ मुकादम तात्या यांच्या जयंतीदिनी माजी विद्यार्थी संघाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ...

विषारी वृत्तीला आयुष्यात थारा देऊ नका!
कुसूर, ता. कऱ्हाड येथील दानशूर बंडो गोपाळा कदम ऊर्फ मुकादम तात्या यांच्या जयंतीदिनी माजी विद्यार्थी संघाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘मुकादम साहित्य पुरस्कार’ वितरणप्रसंगी ते बोलत होते. रयत शिक्षण संस्थेचे माजी प्रा. डॉ. आर. ए. कुंभार यांच्या ‘कुशल प्रशासक - दिवंगत आनंदराव ज्ञानदेव साळुंखे’ या ग्रंथास सपत्निक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्राचार्य डॉ. मोहनराव राजमाने, आर. एस. साळुंखे, ए. एम. मणेर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अन्य दोन पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्राचार्य ए. डी. अत्तार आदर्श शिक्षक पुरस्कार कोरेगाव तालुक्यातील तारगाव येथील शेतकरी हायस्कूलचे पर्यवेक्षक नामदेव हंबीरराव जाधव यांना सपत्निक प्रदान करण्यात आला. तर दिवंगत दतात्रय पंडित गरगटे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘चैतन्य पुरस्कार’ पाटण तालुक्यातील कुसरुंड येथील बाळासाहेब देसाई विद्यालयाच्या उपशिक्षिका मेघमाला नितीन घाडगे यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी नयना शिवणकर यांनी माजी विद्यार्थी संघाला वीस हजार रुपयांचा धनादेश दिला. तर डी.एड. महाविद्यालयासाठी डिजिटल प्रोजेक्टरसाठी माजी विद्यार्थी वि. दा. कुराडे यांनी १३ हजार ५०० रुपयांचा धनादेश प्रदान केला. प्राचार्य डॉ. मोहनराव राजमाने यांनी मनोगत व्यक्त केले. व्ही. आर. सुतार, वि. दा. कुराडे, एस. के. कुंभार, विलासराव कदम आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक जे. के. मोहिते यांनी स्वागत केले. आर. एल. नायकवडी यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य बी. एम. कांबळे यांनी आभार मानले.
फोटो : ३१केआरडी०४
कॅप्शन : कुसूर, ता. कऱ्हाड येथे डॉ. विठ्ठल शिवणकर यांच्या हस्ते प्रा. डॉ. आर. ए. कुंभार यांना मुकादम साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.