शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

"एका निकालाने देशाचा अंदाज बांधू नका", भाजपाचे उदाहरण देत एकनाथ शिंदेंनी मांडली बाजू

By प्रमोद सुकरे | Updated: May 13, 2023 23:50 IST

कर्नाटकच्या निकालाचा परिणाम महाराष्ट्रात होणार नाही!

प्रमोद सुकरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कराड: विधानसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये मतदारांनी दिलेला कौल काँग्रेसच्या बाजूने दिला आहे. परंतु, एखाद्या राज्याच्या निकालावरून आपण महाराष्ट्रसह देशाचा अंदाज बांधू शकत नाही. भाजपला २०१९ पूर्वी झालेल्या विधानसभेसह व लोकसभेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळाला नव्हता. परंतु त्यानंतर नरेंद्र मोदींनी देशात सत्ता मिळवली. त्यामुळे कर्नाटकच्या निकालावरून महाराष्ट्रसह देशाचा अंदाज बांधता येऊ शकत नाही, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. दौलतनगर (मरळी), ता. पाटण येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराजे देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती होती.

फोडाफोडीचे सरकार लोक मानत नाहीत, या शरद पवार यांच्या वक्तव्याबाबत छेडले असता मुख्यमंत्री म्हणाले,  देशात राहुल गांधींची भारत जोडो का तोडो यात्रा सुरू असतानाही मेघालय, त्रिपुरा आणि नागालँडमधील निवडणूका भाजपने जिंकल्या आहेत. त्या-त्या राज्यातील काही स्थानिक प्रश्न असतात. त्यामुळे कर्नाटकच्या निकालाचा संपूर्ण देशावर परिणाम होईल, असे अनुमान कोणी काढू नये. ते स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यासारखे होईल.

ते म्हणाले, कर्नाटकच्या निकालाचा महाराष्ट्रावर अजिबात परिणाम होणार नाही. अडीच वर्षात घरात बसून कोमात गेलेले सरकार लोकांनी पाहिले आहे. तर आमचे दहा महिन्याच्या सरकारचे काम जोमात सुरू आहे. हा फरक जनतेला कळतो. राज्यातील जनतेला काम करणारे सरकार पाहिजे आहे.घरी बसणारे नको आहेत येत्या निवडणुकीत काम करणाऱ्या सरकारच्या पाठीशी जनता ठामपणे उभी राहील.

आपलं घर जळतयं ते बघा...

उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकचा विजय हा मोदी आणि शहांच्या हुकूमशाहीचा पराभव असल्याचे म्हटले आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोणाचा पराभव झाला आणि कोणाचा विजय झाला, हे सर्वांना माहिती आहे. आपलं घर जळतयं ते विझवायचे सोडून दुसऱ्याचे घर जळताना पाहून असुरी आनंद घेणारे काही लोक आहेत. त्यामुळे 'बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना' या म्हणीप्रमाणे त्यांची अवस्था असून त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांना फटकारले.

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकKarnatakकर्नाटकEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा