शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आभाळ कोसळणार नाही, डीजे वाजलाच पाहिजे; उदयनराजेंची रोखठोक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 18:16 IST

ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करून जे लोक डीजेला विरोध करत आहेत त्यांनी जिल्ह्यातील मोठ्या कारखान्यांकडून होत असलेले प्रदूषण आधी पहावे.

सचिन काकडे

सातारा : ''डीजेला विरोध करणाऱ्यांना घरगुती कार्यक्रमात, लग्नात डीजे चालतो. मग सार्वजनिक कार्यक्रमांमध्येच तो का नको? कारखान्यांकडून प्रचंड प्रमाणात प्रदूषण केले जात आहे. त्याच्यापुढे ध्वनी प्रदूषण तर फार किरकोळ बाब आहे. काही झालं तरी डीजे वाजलाच पाहिजे. दोन-तीन तास तो वाजल्यास आभाळ कोसळणार नाही,'' अशी रोखठोक भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी मांडली.सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून डीजेचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. व्यावसायिकांकडून यंदा डीजेला परवानगी द्यावी अशी मागणी केली जात आहे तर दुसरीकडे नागरिकांकडून याला कडाडून विरोध केला जात आहे. पोलीस प्रशासनाने देखील डीजेला कोणत्याही परिस्थितीत परवानगी देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. याविषयी खा. उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली.ते म्हणाले, तुम्ही डीजेला परवानगी द्या अगर नका देऊ; परंतु ज्या व्यावसायिकांनी बँकांचे कर्ज काढून हा व्यवसाय उभा केला त्यांनी काय हातात वाडगं घेऊन बसावं का? जर हे व्यवसायिक स्वतःच्या पायावर उभे राहत असतील तर त्यांना शासनाने सहकार्यच केले पाहिजे.

आधी कारखान्यांकडून होणारे प्रदूषण पहावे ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करून जे लोक डीजेला विरोध करत आहेत त्यांनी जिल्ह्यातील मोठ्या कारखान्यांकडून होत असलेले प्रदूषण आधी पहावे. आज कितीतरी लोक कॅन्सरने बाधित होत आहेत. असे प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर प्रथम कारवाई करायला हवी. मात्र काही मंडळी केवळ डीजेलाच विरोध करीत आहे...तर त्यांचे पालकत्व स्वीकारावेज्या व्यावसायिकांनी बँकांचे, पतसंस्थांचे कर्ज काढून व्यवसाय उभा केला त्यांच्यावरच आज उपासमारीची वेळ आली आहे. कुटुंब कसे चालवावे, हा मोठा प्रश्न त्यांना पडला आहे. डीजेला परवानगी द्यायची नसेल तर शासनाने त्यांचे पालकत्व स्वीकारावे. त्यांची सगळी देणी भागवावीत. डीजे का नको हे शासनाने सांगावे. त्याची कारणे स्पष्ट करावी. दोन-तीन तास डीजे वाजला म्हणजे काय मोठं आभाळ कोसळणार नाही; परंतु जर डीजेला परवानगी दिली नाही तर व्यवसायिकांवर मोठ संकट निश्चित कोसळेल. काही झालं तरी डीजेला परवानगी मिळायलाच हवी.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरGanesh Mahotsavगणेशोत्सवUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले