डॉक्टरांचे असहकार आंदोलन

By Admin | Updated: May 25, 2014 00:33 IST2014-05-25T00:24:27+5:302014-05-25T00:33:09+5:30

राज्य शासनाला इशारा : राजेश गायकवाड यांची माहिती

Doctor's Non-Cooperation Movement | डॉक्टरांचे असहकार आंदोलन

डॉक्टरांचे असहकार आंदोलन

 कºहाड : ‘राज्यातील बारा हजार वैद्यकीय अधिकारी प्रलंबित मागण्यांसाठी २ जूनपासून असहकार आंदोलन करणार आहेत. आमच्या मागण्या ३१ मेपर्यंत पूर्ण कराव्यात, अन्यथा आंदोलनास सामोरे जावे,’ असा इशारा राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड यांनी दिला आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेच्या पदाधिकार्‍यांची शनिवारी कºहाडात बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष अरुण खरमाटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. गायकवाड म्हणाले, ‘राज्यातील सुमारे ८० टक्के जनतेला आरोग्य सुविधा पुरविण्याचे काम वैद्यकीय अधिकारी करतात; पण शासनाने वेळोवेळी त्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. गेल्या तीन वर्षांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री, मुख्य सचिव यांच्या वेळोवेळी बैठका झाल्या. मागण्यांची अमलबजावणी करू, अशी आश्वासने मिळाली; मात्र कार्यवाही काहीच न झाल्याने पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उपसावे लागत आहे. वास्तविक राज्याच्या एकूण अर्थसंकल्पाच्या आठ टक्के रक्कम ही आरोग्य विभागावर खर्च होणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात १.७५ टक्के रक्कमच आरोग्य विभागावर खर्च होत असून, आरोग्याबाबतचे अन् कर्मचार्‍यांचे प्रश्न कसे मिटणार? हा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी यात वेळीच लक्ष घालण्याची गरज आहे.’ खरमाटे म्हणाले, ‘वैद्यकीय अधिकार्‍यांच्या आंदोलनाला आरोग्य कर्मचारी संघटनेचा पाठिंबा आहे. आरोग्य कर्मचार्‍यांच्या मनात शासनाच्या विरोधात असंतोष आहे. निवडणुकीत संघटनेने चुणूक दाखविली आहे. राज्य सरकारने यातून धडा न घेतल्यास सहा महिन्यांनंतर त्यांनाही घरी बसविण्यास आमचा हातभार लागेल. (प्रतिनिधी)

Web Title: Doctor's Non-Cooperation Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.