शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
3
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
4
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
5
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
6
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
7
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
8
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
9
आजी-आजोबांच्या ‘स्क्रीन’च्या ‘व्यसनां’चं काय करणार?
10
गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
11
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
12
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
13
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
14
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
15
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
16
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
17
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
18
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
19
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
20
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांची हेल्मेटची सवय बनली सुरक्षा कवच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:37 IST

सातारा: दैनंदिन जीवनामध्ये अनेकांना वेगवेगळ्या सवयी लागून राहतात. अशा काही सवयींमुळे काहींना त्रास होतो तर काहींना त्यातून आनंद मिळतो. ...

सातारा: दैनंदिन जीवनामध्ये अनेकांना वेगवेगळ्या सवयी लागून राहतात. अशा काही सवयींमुळे काहींना त्रास होतो तर काहींना त्यातून आनंद मिळतो. अशाचप्रकारे डॉ. प्रदीप कालेकर यांना हटके आणि अनोखी सवय लागलीय. ती म्हणजे डोक्यात हेल्मेट घालण्याची. दुचाकी सुरू करण्यापूर्वी त्यांच्या डोक्यात हेल्मेट नसले तर त्यांना गाडी चालविताच येत नाही, अशी त्यांची धारणा झालीय. त्यामुळे हेल्मेटविना डॉक्टरांची गाडी कधीच पुढे सरकतच नाही. ही अनोखी सवय मात्र, डॉक्टरांची सुरक्षा कवच बनलीय.

जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रदीप कालेकर हे डोळ्यांचे डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. एकतीस वर्षांपूर्वी ते सांगली जिल्ह्यातील जत येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत होते. त्यावेळी त्यांना दुचाकीवरून रुग्णालयात ये-जा करावे लागत होते. त्यावेळी त्यांनी हेल्मेट घेतले. मात्र, गाडी चालविताना हेल्मेट डोक्यात घातल्यानंतर सुरुवातीला मान आणि डोके त्यांचे दुखू लागले. परंतु हेल्मेट हे सुरक्षा कवच आहे, असे मानून त्यांनी प्रवासदरम्यान हेल्मेटची सवय करून घेतली. ही अनोखी सवय त्यांना प्रवासादरम्यान स्वस्थ बसू देत नाही. ही सवय इतकी लागली आहे की, हेल्मेटविना त्यांना गाडी चालविताच येत नाही. आतापर्यंत ३१ वर्षे त्यांची सेवा झाली आहे. या कालावधीत त्यांनी तब्बल ३२ हेल्मेट वापरली आहेत. काही हेल्मेट चोरीला गेली तर काही हेल्मेट पडून खराब झाली. त्यामुळे रोजच्या कपड्यांसारखी त्यांच्याकडे हेल्मेट तीन ते चार शिल्लक असतात. दुचाकी चालविताना हेल्मेट डोक्यात घालणे हे अत्यंत गरजेचे आहे. शासनाने अनेकदा हेल्मेट सक्ती केली. मात्र, अनेकजण हेल्मेटविनाच गाडी चालवतात. त्यामुळे अनेक दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागलाय. डॉ. कालेकर यांची अनोखी सवय इतर दुचाकीस्वारांना खरे तर प्रेरणादायी अशीच आहे. मान, डोके दुखतेय, सांभाळायचे कसे, चोरीला जाईल, अशा अनेक कारणांमुळे दुचाकीस्वार हेल्मेट घालत नाहीत. परंतु वेळ सांगून येत नाही. कधी आपल्या मृत्यूला हेल्मेट नसणे कारणीभूत ठरेल, हे स्वप्नातही वाटणार नाही. त्यामुळे डॉ. कालेकरही इतर दुचाकीस्वारांना हेल्मेट घालण्याचा वारंवार सल्ला देत आहेत.

चौकट : मुलाच्या मृत्यूची मनात सल!

डॉ. प्रदीप कालेकर यांचा अठरा वर्षांचा मुलगा ओंकार कालेकर याचाही काही वर्षांपूर्वी दुचाकी अपघातात मृत्यू झाला. स्वत: ला हेल्मेटचे महत्त्व उमगल्याने त्यांनी स्वत:साठी हेल्मेटला सुरक्षा कवच बनवले. पण मुलगा घटनेदिवशी घाईगडबडीत हेल्मेट घालणे विसरला आणि त्यांच्यापासून कायमचा निघून गेला. ही सल त्यांच्या मनात आजही कायम घर करून आहे.