सातारा : म्हसवड, ता. माण येथील एका डाॅक्टरांना ५० लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून म्हसवड पोलिस ठाण्यात पाच जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. संग्राम शेटे, दिनेश गोरे, अमोल राऊत, नितीन केवटे, दीपक रूपनवर (सर्व रा. म्हसवड, ता. माण), अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.याप्रकरणी डॉ. बाबासाहेब मारुती दोलताडे (वय ४६, रा. दोलताडे हॉस्पिटल, शिंगणापूर रोड, म्हसवड, ता. माण) यांनी सातारा शहर पाेलिस ठाण्यात १० डिसेंबर २०२५ रोजी फिर्याद दिली. त्यानंतर झीरो नंबरने हा गुन्हा म्हसवड पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.डाॅ. दोलताडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, माहे ॲाक्टोबर २०२५ ते दि. १० डिसेंबर या कालावधीत म्हसवड येथील दोलताडे हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला आहे. लक्ष्मण राखोंडे हा हॉस्पिटलमध्ये अकाउंटट म्हणून काम करत होता. त्याने अंदाजे सात लाखांचा अपहार केल्याचा तक्रार अर्ज म्हसवड पोलिस ठाण्यात मी दिला होता. ती तक्रार माघारी घेण्यासाठी सर्व संशयितांनी संगनमत करून एका महिलेस सीएमएस पोर्टलवर अत्याचाराची खोटी तक्रार करण्यास लावून हे प्रकरण मिटविण्यासाठी १ कोटीची मागणी करण्यात आली.सरतेशेवटी तडजोडीअंती ५० लाख रुपयांची मागणी केली. दोन दिवसांत पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली. माझ्यावर पाळत ठेवली जात होती. त्यामुळे मी साताऱ्याकडे निघून आलो. संबंधितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे मला म्हसवड पोलिस ठाण्यात जाऊ देणार नाहीत, अशी माझी खात्री झाल्याने मी सातारा शहर पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली, असेही डाॅ. दोलताडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.दरम्यान, हे प्रकरण संवेदनशील असल्यामुळे या प्रकरणाचा तपास एलसीबीकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक झाली नव्हती.तुम्ही आम्हाला एक कोटी द्या!हे प्रकरण मिटवायचे असेल तर तुम्ही आम्हाला १ कोटी रुपये द्या, अशी मागणी केली होती; परंतु तडजोडीअंती ५० लाख मागितले, असेही डाॅ. बाबासाहेब दोलताडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
Web Summary : A doctor in Mhaswad, Satara, was extorted for ₹50 lakhs. Police have registered a case against five suspects. The accused initially demanded ₹1 crore to settle the matter, later reduced to ₹50 lakhs. Investigation is underway.
Web Summary : सतारा के म्हसवड में एक डॉक्टर से ₹50 लाख की वसूली की गई। पुलिस ने पांच संदिग्धों के खिलाफ मामला दर्ज किया है। आरोपियों ने पहले मामले को निपटाने के लिए ₹1 करोड़ की मांग की, बाद में ₹50 लाख पर आ गए। जांच जारी है।