कातरखटाव येथे अपघातात डॉक्टर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:40 IST2021-07-30T04:40:35+5:302021-07-30T04:40:35+5:30
कातरखटाव : कातरखटाव (ता. खटाव) येथे मायणी - दहिवडी महामार्गावर चारचाकी वाहनांचा धक्का लागून झालेल्या अपघातात कातरखटाव ...

कातरखटाव येथे अपघातात डॉक्टर जखमी
कातरखटाव : कातरखटाव (ता. खटाव) येथे मायणी - दहिवडी महामार्गावर चारचाकी वाहनांचा धक्का लागून झालेल्या अपघातात कातरखटाव येथील डॉ. एन. ए. मोहिते (वय ६४) हे जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, डॉक्टर मोहिते हे सेवानिवृत्त झाल्यापासून कातरखटाव येथे गेली दहा वर्षे खासगी रुग्णालय सुरू करून रुग्णांची सेवा करीत होते.
बुधवारी काही कामानिमित्त बोंबाळे रस्त्यावर दुचाकीवरून येथे लसीकरण केंद्राला भेट देण्यासाठी गेले. नुकतेच महामार्ग डांबरीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे येणाऱ्या - जाणाऱ्या वाहनांना वेगमर्यादा राहिली नाही. अशातच त्यांच्या दुचाकीला चारचाकीची धडक लागल्याने ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर वडूज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.