कऱ्हाडचा भूगोल बदलण्याचा प्रयत्न करू नका
By Admin | Updated: July 16, 2015 00:06 IST2015-07-16T00:06:06+5:302015-07-16T00:06:06+5:30
नगरसेवक आक्रमक : मलकापूर नगरपंचायतीच्या विकास आराखड्याबाबत संताप--कऱ्हाड पालिका सभा

कऱ्हाडचा भूगोल बदलण्याचा प्रयत्न करू नका
कऱ्हाड : कऱ्हाडला अनेक शतकांचा इतिहास आहे. परंतु काही वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या मलकापूरच्या सत्ताधाऱ्यांनी दादागिरी करून कऱ्हाड शहरातील मालमत्ता आपल्या हद्दीत ओढण्याचा सपाटा लावला आहे. कऱ्हाडचा भूगोल बदलण्याचा प्रयत्न करू नये; अन्यथा पालिकेतील पदाधिकाऱ्यांसह नागरिकांना या विरोधात रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा पालिकेच्या विशेष सभेत नगरसेवकांनी दिला.ङ्कमलकापूर नगरपंचायतीच्या विकास आराखड्यावर सूचना व हरकती घेण्याबाबत कऱ्हाड पालिकेची विशेष सभा बुधवारी आयोजित करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा विद्याराणी साळुंखे होत्या. यावेळी नगरविकास विभागाचे सहायक संचालक श्रीकांत देशमुख, पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत रोडे उपस्थित होते. ङ्कमलकापूर नगरपंचायतीकडून अंतिम मंजुरीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या विकास आराखड्यामध्ये कऱ्हाड शहरातील हद्दीतील एकूण २३ सर्व्हे नंबर मलकापूर हद्दीत दाखविल्याबद्दल सत्ताधारी तसेच विरोधी नगरसेवकांनी प्रक्षुब्ध प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव म्हणाले, ‘नगरविकास विभाग कऱ्हाड व मलकापूरसाठी वेगवेगळे निकष लावत असते. आम्ही कऱ्हाडच्या हद्दीतील एकही जागा मलकापूरला देणार नाही. महाराष्ट्र-कर्नाटकप्रमाणे कऱ्हाड-मलकापूर वाद पेटवला जात आहे. कऱ्हाडामधील अनेक ठिकाणे मलकापूर हद्दीत दाखविण्यात
येते.’ लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाष पाटील म्हणाले, ‘नगरविकास विभाग राजकीय दबावाला बळी पडल्याचे जाणवत आहे. आम्ही वेळोवेळी केलेल्या पत्रव्यवहाराची दखलही घेतली जात नाही. मलकापुरातील सत्ताधाऱ्ऱ्यांची आलेली राजकीयङ्कमस्ती उतरवण्यातही आम्ही कमी पडणार नाही.’ अॅड.ङ्कमानसिंंगराव पाटील म्हणाले, ‘मलकापूरशी कऱ्हाड पालिकेने नेहमी सहकार्याचीच भूमिका ठेवली आहे.
नगरविकास विभागाने मात्र कऱ्हाडला कधीच सहकार्य केले नाही. अनेकवेळाङ्कमागणी करूनही आजतागायत विकास आराखड्याचा नकाशाही पाहण्यास देण्यात आला नाही. आम्ही यापूर्वी १२ सर्व्हे नंबर मलकापूरला स्वेच्छेने दिले होते; परंतु आता मलकापूर आणखी २१७ कुटुंबे नगरपंचायतीत घेऊ पाहत आहे. उद्या ते दत्त चौकापर्यंतही आपली हद्द सांगू लागतील.’
नगरसेवकांच्या भावना वरिष्ठ पातळीवर पोहोचविण्याचे तसेच कऱ्हाडमधील विकास आराखड्याचे नकाशे का दिले नाहीत, याबाबत चौकशीचेही आश्वासन देशमुख यांनी यावेळी दिले. (प्रतिनिधी)
राजकीय वजनाकडे नगर विकासचे पारडे झुकतेय!
नगरसेवक विनायक पावसकर म्हणाले, ‘जिकडे राजकीय वजन अधिक तिकडे नगरविकास विभागाचे पारडे अधिक झुकताना दिसत आहे. कऱ्हाडचे गॅझेट मलकापूरपूर्वी प्रसिद्ध झाले असताना त्यांनी कऱ्हाडमधील मालमत्ता आपल्या हद्दीत दाखविल्याच कशा ? कऱ्हाडमधील महत्त्वाची ठिकाणे तोडून मलकापूरला जोडण्याचा प्रयत्न निषेधार्ह आहे. नगरविकास विभागाचे नेहमीच मलकापूरला अधिक सहकार्य दिसून येत असते.’