सातारा दुर्गा उत्सवात वर्गणी नकोे... प्रायोजक व्हा !

By Admin | Updated: September 17, 2014 22:25 IST2014-09-17T21:32:58+5:302014-09-17T22:25:26+5:30

हायटेक आमंत्रण,हस्ते-परहस्ते प्रायोजकत्व

Do not subscribe to Satara Durga Festival ... Be a Sponsor! | सातारा दुर्गा उत्सवात वर्गणी नकोे... प्रायोजक व्हा !

सातारा दुर्गा उत्सवात वर्गणी नकोे... प्रायोजक व्हा !

प्रगती जाधव-पाटील- सातारा  दुर्गा उत्सवात तरूण आणि महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी छुप्या पध्दतीने इच्छुकांनी व्यूहरचना सुरू केली आहे. आचारसंहितेच्या कचाट्यात न सापडता आपल्या नावाचा बोलबोला करून घेऊन हे उमेदवार वर्गणी ऐवजी प्रायोजकत्व देण्यास प्राधान्य देत आहेत.निवडणुकीत प्रभावी मतदार म्हणून तरूणाईकडे सर्वांचेच लक्ष आहे. स्वत:चे मत असणारी आणि कोणत्याही आमिषांना बळी न पडणारी ही तरूणाई आपल्या बाजूला वळवून घ्यायची असेल तर त्यासाठी त्यांच्याच आवडीच्या क्षेत्रात घुसले पाहिजे हे इच्छुकांना चांगलेच समजले आहे. त्यामुळे त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. अनायसे दुर्गोत्सव उंबरठ्याशी येऊन पोहोचला आहे.
निवडणूक प्रचारासाठी जेमतेम एक महिना मिळाला आहे. यात महिला मतदारांना आकर्षित करायचे असेल तर त्यासाठी हीच संधी आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी आपापल्या परीने खास महिलांसाठी रास-दांडियाचे आयोजन करून विविध प्रकारची आकर्षक बक्षिसे भेट देण्याचे ठरविले आहे. वर्गणी देऊन मंडळाला खूष करण्यापेक्षा दांडियाच्या स्पर्धा घेऊन त्यात यशस्वी होणाऱ्या मतदाराला थेट बक्षीस देण्याची आयडिया यावेळी काढण्यात आली आहे. दरवर्षीपेक्षा यंदाचा दुर्गोत्सवात महागड्या वस्तू भेट म्हणून मिळणार आहे. काही मंडळांनी वॉशिंग मशीन, एलईडी टीव्ही, मायक्रोवेव्ह यांसारखी बक्षिसे खास महिलांसाठी ठेवण्याचे ठरविले आहे, तर तरूणाईला आकर्षित करण्यासाठी महागडे अँड्रॉइड मोबाईल ‘विथ नेट पॅक’ देण्याची तयारीही सुरू आहे. आचारसंहितेचा धसका घेऊन त्या नियमात ही बक्षिसे कशी बसतील याविषयी सध्या कथ्याकूट सुरू आहे. लवकरच यावर तोडगा काढून ही बक्षिसे अंतिम करण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली आहे.

हायटेक आमंत्रण
तरूणाईपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वाधिक जवळचे माध्यम सध्या व्हॉटस् अ‍ॅप, टेलिग्राम, व्हायबर आहे. या माध्यमातून सध्या विविध ग्रुपस् अ‍ॅक्टिव झाले आहेत. नवरात्र आणि दांडियाच्या अनुषंगाने होणाऱ्या छोट्या छोट्या माहितीही या ग्रुपवर येवू लागल्या आहेत. नवरात्रीच्या आधीपासूनच यंदा मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी तरूणांना आकर्षित करण्यासाठी हा नवा फंडा आजमावला आहे. त्यामुळे यंदा अनेकांना हायटेक आमंत्रण मिळत आहेत.

हस्ते-परहस्ते प्रायोजकत्व
जिल्ह्यातील अनेक उमेदवारांना दांडियाच्या माध्यमातून युवावर्गाला ैऐन निवडणूककाळात खूश ठेवायचे आहे. रास-दांडिया ही उत्तम संधी असली, तरी थेट सहभाग टाळावा लागत आहे. त्यामुळेच डोळ््यावर येणार नाही, अशा रीतीने दांडियासाठी हस्ते-परहस्ते पैसा पुरविण्याचे नियोजन सुरू आहे. फारसे चर्चेत नसलेल्या कार्यकर्त्यांना नवरात्रोत्सवात पुढे केले जाण्याची शक्यता असून, त्यांच्या मार्फतच दांडियासाठी आणि बक्षिसांसाठी निधी पुरविण्याचे नियोजन अनेकांनी केले आहे.

Web Title: Do not subscribe to Satara Durga Festival ... Be a Sponsor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.