कऱ्हाडात ‘थकबाकी नको; पण फ्लेक्स आवरा!’
By Admin | Updated: March 1, 2016 00:10 IST2016-02-29T22:57:47+5:302016-03-01T00:10:48+5:30
पालिकेची गांधीगिरी : संकलित कर भरण्यासाठी पालिकेत गर्दी; सोमवारी दिवसभरात सुमारे ६५ लाख वसूल

कऱ्हाडात ‘थकबाकी नको; पण फ्लेक्स आवरा!’
कऱ्हाड : कऱ्हाडातील सोमवार पेठेत रविवारी संध्याकाळी थकबाकीधारकांच्या नावाचे बोर्डही झळकले अन् सोमवारी दिवसभर पालिकेच्या वसुली विभागात लोकांनी पैसे भरण्यासाठी गर्दी केली.कऱ्हाड पालिकेच्या वतीने नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या थकबाकीधारकांच्या नावांमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पालिकेच्या वतीने आता गांधीगिरीच्या मार्गाने थकबाकीधारकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील सात प्रभागातील सुमारे ६ हजार ११६ हून अधिक थकबाकीधारकांकडून वर्षभर पैसे भरण्यासाठी केली जात असलेली टाळाटाळ आता नाहीशी झाली आहे. सोमवारी दुपारपर्यंत १९ लाखांची रोख रक्कम आणि १६ लाखांच्या आसपास चेक पालिकेत जमा झाले. तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण ६५ लाख रूपये थकबाकी पालिकेत जमा झाली.
शहरातील घरपट्टी व पाणी पट्टीसह एकूण संकलित कर भरणाऱ्यांमध्ये डॉक्टर, व्यापाऱ्यांसह मेहरबानांच्याही नातेवाइकांचा समावेश आहेत. तर दुसरीकडे पालिकेच्या वतीने थकबाकीधारकांच्या नावांचे फलक तयार करण्यात येत आहेत. फलकावर आपल्या नातेवाइकांची नावे नाहीत ना! तशी असतील तर ती काढून टाकण्यासाठी सध्या मेहरबांनांकडून पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना फोनवरून विनवणी केली जात असल्याची चर्चा पालिका वर्तुळात ऐकावयास मिळत आहे. थांबा साहेब, आमची कराची रक्कम भरतो आमचे नाव टाकू नका, असे सांगत थकबाकीधारक आपल्या कराची रक्कम पालिकेत येऊन भरत आहेत. रविवारी सायंकाळी सोमवार पेठेतील थकबाकीधारकांची नावे सोमवार पेठेत पालिकेच्या वतीने लावण्यात आली होती. मात्र, फलक लावण्यात आले असल्याचे समजताच नागरिकांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली. तसेच लावण्यात आलेल्या ‘त्या’ फलकावर आपल्या नातेवाइकांची नावे तर नाहीत ना अशी माहिती घेत काही मेहरबानांनी फोन करून मुख्याधिकारी व करवसुली प्रमुखांना विचारणा करण्यास सुरुवात केली. तसेच लावण्यात आलेले फलक काढण्यात यावेत, अशी विनवणी केली असल्याची चर्चा होती. (प्रतिनिधी)
फलक काढण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव
पालिकेच्या वतीने शहरातील थकबाकीधारकांच्या नावांचे फलक तयार करण्यात येत असल्याने त्यात आपले नाव येऊ नये म्हणून अनेकजण मेहरबानांकडे जाऊन त्यांच्याकडून अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याप्रमाणे अनेक मेहरबानही त्या-त्या पेठांतील करवसुली क्लार्कवर नावे न टाकण्यासाठी व फलक न लावण्यासाठी दबाव टाकत असल्याची चर्चा दबक्या आवाजात कर्मचारी वर्गातून केली जात आहे. त्यामुळे खरोखरच थकबाकीधारकांनी पथकाने राबविलेल्या मोहिमेची धास्ती घेतली असल्याचे निदर्शनास आले आहे.
अशी झाली सोमवारी थकबाकी वसुली..
कऱ्हाड पालिकेच्या करवसुली विभागात सोमवारी थकबाकीधारकांनी संकलित कर भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यामध्ये