खासगी डॉक्टरांची फी परवडेना

By Admin | Updated: December 21, 2015 00:52 IST2015-12-20T22:49:27+5:302015-12-21T00:52:39+5:30

मेंढपाळानाही डॉक्टरांना बोलावून वाट पाहत बसावे लागत आहे. अशा कारणांमुळे मेंढपाळासह, पशुपालकांची गैरसोय होत असून, ही गैरसोय दूर करण्याची मागणी

Do not charge for a private doctor | खासगी डॉक्टरांची फी परवडेना

खासगी डॉक्टरांची फी परवडेना

दुधेबावी : दुधेबावीमध्ये जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शेतकरी जादा प्रमाणात असल्याने येथील शेतकरी जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करताना दिसतो. मात्र, येथे पशुवैद्यकीय रुग्णालय नसल्याने खासगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागतो. खासगी डॉक्टरांची फी परवडत नाही.जनावरे आजारी पडल्यानंतर डॉक्टरांना बोलविल्यानंतर किमान शंभर रुपये फी द्यावी लागत आहे. आणि आजार मोठा असेल तर त्यापेक्षा जादा पैसे भरावे लागत आहेत. तसेच औषधांचे पैसे वेगळेच होत असल्याने मेंढपाळांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी मेंढपाळानाही डॉक्टरांना बोलावून वाट पाहत बसावे लागत आहे. अशा कारणांमुळे मेंढपाळासह, पशुपालकांची गैरसोय होत असून, ही गैरसोय दूर करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
दुधेबावीपासून सुमारे दोन-तीन किलोमीटर अंतरावर भाडकी खुर्द, वडले, तिरकवाडी, वांजाळे वस्ती, सोनवडी, अशी गावे असून, दुधेबावी येथे दवाखाना सुरू केल्यास गावातील शेतकऱ्यांना सुविधा मिळून त्यांचीही गैरसोय दूर होण्यास मदत होणार
आहे. खासगी डॉक्टर वेळेत न आल्यामुळे काहीवेळा जनावरे दगावण्याची घटना घडल्या आहेत. दुधेबावीपासून सुमारे पाच-सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गिरवी या गावामध्ये पशुवैद्यकीय दवाखाना सुरू असून, गिरवीला जाण्यासाठी डोंगराळ भागामध्ये असल्याने शेतकरी जनावरे घेऊन गिरवीला जाऊ शकत नाहीत. (प्रतिनिधी)

दुधेबावीमध्ये पशुवैद्यकीय दवाखाना होणे गरजेचे असून, तो होण्यासाठी संबंधित विभागाने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करून लवकरात लवकर शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी.
- सुभाष सोनलवकर, दुधेबावी
दुधेबावीमध्ये पशुवैद्यकीय दवाखाना होण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी प्रशासनानेही आम्हाला सहकार्य करावे. पशुवैद्यकीय दवाखाना सुरू न केल्यास आंदोलन करणार आहोत.
- विकास सोनलवकर, रासप संघटक

Web Title: Do not charge for a private doctor